अंकुश गुंडावार।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : एकीकडे पर्यावरणाचा ºहास, वृक्षांचे प्रमाण कमी होत चालल्याने त्याचे पर्यावरणावर प्रतिकुल परिणाम होत आहे. त्यामुळे पर्यावरण प्रेमी आणि अभ्यासकांकडून यावर चिंता व्यक्त केली जात आहे.मात्र दुसरीकडे गोंदिया जिल्ह्यातील एकूण वन क्षेत्रात १५ चौरस किमीने वाढ झाल्याची दिलासा दायक बाब इंडियाज स्टेट फारेस्ट रिपोर्ट २०१९ अंतर्गत पुढे आली आहे. यामुळे निश्चित ही बाब जिल्हावासीयांसाठी अभिमानाची आहे.काही दिवसांपूर्वी पर्यावरण तज्ज्ञांनी वातावरणातील बदलाचा सर्वाधिक परिणाम विदर्भातील तीन जिल्ह्यांवर होत असल्याचे सांगितले होते. तसेच या मागील कारणे देखील सांगितली होती. त्यामुळे जिल्हावासीयांमध्ये सुध्दा चिंतेचे वातावरण होते. मात्र इंडियाज स्टेट फॉरेस्ट रिपोर्ट २०१९ च्या अहवाल नुकताच जाहीर करण्यात आला. या अहवालाने ही चिंता काहीशी दूर होण्यास मदत झाली आहे. या अहवालानुसार गोंदिया जिल्ह्यातील वन लागवडीखालील क्षेत्र वाढले आहे. विशेष म्हणजे वनांचे जिल्हे म्हणून ओळख असलेल्या चंद्रपूर, नागपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांच्या वनक्षेत्रात घट झाली आहे. गोंदिया जिल्ह्यातील एकूण २७२३.०७६ चौरस किमी ऐवढे एकूण वन क्षेत्र आहे. त्यात आता १५ चौरस किमी वन क्षेत्राची भर पडली आहे. जिल्ह्यातील नागरिकांचा वृक्ष लागवडीकडे वाढत असलेला कल, पर्यावरण संवर्धनाप्रती निर्माण होत असलेली जागरुकता, वन विभाग, सामाजिक वनीकरण यांनी राबविलेल्या उपाय योजनांचे हे फलित आहे.राज्यातील तत्कालीन भाजप सरकारचे तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राबविलेल्या, ३३ कोटी वृक्ष लागवड योजनेचा सुध्दा हा परिणाम आहे. या सर्व गोष्टींमुळे जिल्ह्यातील वनक्षेत्रात वाढ झाली आहे.३३ कोटी वृक्ष लागवड योजनेची ९३ टक्के रोपटी जिवंतराज्यातील तत्कालीन भाजप सरकारने पर्यावरण संवर्धनासाठी वनांच्या क्षेत्रात वाढ होण्यासाठी ३३ कोटी वृक्ष लागवड योजना राबविली. यातंर्गत गोंदिया जिल्ह्यात ९ लाख ७९ हजार ०२३ रोपट्यांची लागवड करण्यात आली. यापैकी ९३ टक्के रोपटी जिवंत आहे.तर यापूर्वी २०१७ मध्ये लागवड केलेल्या रोपट्यांपैकी ८३ टक्के, २०१६ मधील ९८ टक्के, २०१८ मधील ८९ टक्के रोपटी जिवंत असल्याचा अहवाल सामाजिक वनीकरण विभागाने दिला आहे.तीन वर्षांपर्यंत सामाजिक वनीकरण विभागाची जवाबदारीजिल्ह्यात वृक्ष लागवड योजनेतंर्गत वृक्षारोपण केलेल्या रोपट्यांचे संवर्धन करण्याची जवाबदारी ही तीन वर्षांपर्यंत सामाजिक वनीकरण विभागाची असते. त्यानंतर या रोपट्यांचे संवर्धन करण्याचे काम संबंधित विभागाकडे सोपविले जाते.८ हजार ५९९ वनहक्क पट्टयांचे वाटपवन विभागातंर्गत आत्तापर्यंत जिल्ह्यातील ८ हजार ५९९ लाभार्थ्यांना वनहक्क जमिनीच्या पट्यांचे वाटप करण्यात आले. तर ८५५ लाभार्थ्यांना सामुहिक वनपट्टयांचे वापट करण्यात आले. तर काही लाभार्थ्यांना पुन्हा वनहक्क पट्टयाचे वापट करण्यात येणार असल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.पर्यावरणाच्या ºहासाचे परिणाम हळूहळू नागरिकांच्या लक्षात येत आहे. त्यामुळे पर्यावरण संवर्धनाप्रती जागृरुकता निर्माण होत आहे. तर शासनाचा सुध्दा वृक्ष लागवडीवर भर आहे. तसेच वन विभागातर्फे वेळोवेळी उपाय योजना करण्यात येत आहेत. यासर्व गोष्टींमुळे जिल्ह्यातील वन क्षेत्रात वाढ होत आहे. ही खरोखरच जिल्हावासीयांसाठी आनंदाची बाब आहे.- सावन बहेकार, अध्यक्ष सेवा संस्था (पर्यावरण)
जिल्ह्यातील वनक्षेत्रात होतेय वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 6:00 AM
काही दिवसांपूर्वी पर्यावरण तज्ज्ञांनी वातावरणातील बदलाचा सर्वाधिक परिणाम विदर्भातील तीन जिल्ह्यांवर होत असल्याचे सांगितले होते. तसेच या मागील कारणे देखील सांगितली होती. त्यामुळे जिल्हावासीयांमध्ये सुध्दा चिंतेचे वातावरण होते. मात्र इंडियाज स्टेट फॉरेस्ट रिपोर्ट २०१९ च्या अहवाल नुकताच जाहीर करण्यात आला. या अहवालाने ही चिंता काहीशी दूर होण्यास मदत झाली आहे.
ठळक मुद्दे१५ चौरस किमी क्षेत्र वाढले । इंडियाज स्टेट फॉरेस्ट रिपोर्ट, वृक्ष लागवड मोहिमेचा होतोय परिणाम