शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
3
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
4
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
5
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
6
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

तालुक्यात २८ महिला बचत भवन उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2019 11:44 PM

तालुक्यात महिला आर्थिक विकास महामंडळाने बचतगटाची मोठी चळवळ सुरु केली आहे. ग्रामीण आणि शहरी भागात ८३३ बचत गटांच्या माध्यमातून ९ हजार ७७२ महिला संघटीत होवून उद्योग व्यवसाय सुरु करुन स्वावलंबनाकडे वळत आहे.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : प्रधानमंत्री मुद्रा योजना महिला मेळावा, सक्षमीकरणासाठी प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : तालुक्यात महिला आर्थिक विकास महामंडळाने बचतगटाची मोठी चळवळ सुरु केली आहे. ग्रामीण आणि शहरी भागात ८३३ बचत गटांच्या माध्यमातून ९ हजार ७७२ महिला संघटीत होवून उद्योग व्यवसाय सुरु करुन स्वावलंबनाकडे वळत आहे. आता महिलांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे यासाठी त्यांच्या सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी गोंदिया तालुक्यात २८ गावात महिला बचतगट भवन बांधणार असल्याचे प्रतिपादन आ.गोपालदास अग्रवाल यांनी केले.जिल्हास्तरीय मुद्रा बँक योजना समन्वय समिती, नियोजन विभाग व महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि उत्कर्ष लोकसंचालीत साधन केंद्र गोंदियाच्या सहकार्याने आयोजित प्रधानमंत्री मुद्रा योजना महिला कौशल्य विकास रोजगार,उद्योजकता मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जि.प.अध्यक्ष सीमा मडावी होत्या. यावेळी प्रामुख्याने जि.प.महिला व बाल कल्याण समिती सभापती लता दोनोडे, पं.स.सभापती माधुरी हरिणखेडे, नगरसेवक भावना कदम, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक निरज जागरे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे,जिल्हास्तरीय मुद्रा बँक योजना समन्वय समितीचे सदस्य धनंजय वैद्य, सामाजिक कार्यकर्त्या डॉ.सविता बेदरकर, उत्कर्ष लोकसंचालीत साधन केंद्राच्या अध्यक्ष तुलसी चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. अग्रवाल म्हणाले, एकीकडे मोठे उद्योगपती बँकांचे कर्ज बुडवून पळून जातात. मात्र बचतगटातील महिला या घेतलेल्या कर्जाची परतफेड वेळीच करतात.महिला ही घरची अर्थ आणि गृहमंत्री आहे.घराचे बजेट कसे करायचे हे काम महिला चांगल्याप्रकारे करतात. महिलांच्या बचतगटाच्या चळवळीला सर्वांकडून मदत मिळाली पाहिजे. बँकांनी बचतगटांना कर्ज देतांना कमी व्याज दर आकारण्याचा विचार केला पाहिजे.बचतगटांना व्याजदरात सवलत मिळाली तर ही चळवळ आणखी सक्षम होईल.महिलांचा विकास झाला पाहिजे, त्यांना चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजे यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. प्रत्येक ग्रामसंघाला बचत भवन असले पाहिजे ही आपली इच्छा आहे. तालुक्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी २८ बचत भवन बांधण्यात येणार असून त्यासाठी २ कोटी रुपयांचे नियोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.याच महिन्यात या बचत भवनांचे भूमीपूजन करण्यात येईल असे सांगितले. या वेळी जागरे, खडसे यांनी समायोचित मार्गदर्शन केले.उत्कृष्ट कार्य करणाऱ्या संस्थांचा गौरवयावेळी उत्कृष्ट ग्रामसंस्था म्हणून सहयोग ग्रामसंस्था बाघोली,उत्कृष्ट वस्तीस्तर संघ म्हणून गोंदिया येथील शिल्पकार वस्तीस्तर संघ, सात लाख रु पये घेऊन व्यवसाय सुरु करणारा गणखैरा येथील ओमश्री स्वयंसहाय्यता बचतगट,गोंदिया रामनगर येथील रजा महिला बचतगट, यशस्वी महिला उद्योजक म्हणून सेजगाव येथील ममता बारेकर,बचतगटांच्या महिलांचे पाल्य यांनी दहावी व बारावी परीक्षेमध्ये चांगले यश संपादन केल्याबद्दल एकोडी येथील देवकी ठाकरे, गोंदिया येथील संस्कृती काळे यांचा गौरवचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.मुद्रा योजनेतंर्गत महिलांना कर्जमुद्रा योजनेअंतर्गत १५ महिलांना १२ लाख रु पयांचे कर्ज मंजुरीचे पत्र देण्यात आले.यामध्ये भारतीय स्टेट बँक आॅफ इंडिया शाखा गोंदिया ६ लाभार्थी, बँक आॅफ इंडिया शाखा एकोडी २ लाभार्थी,विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा गोंदिया २ लाभार्थी, बँक आॅफ महाराष्ट्र शाखा गोंदिया ४ लाभार्थी आणि इंडियन ओव्हरसीस बँक शाखा गोंदिया १ लाभार्थी, अशा एकूण १५ लाभार्थ्यांना कर्ज मंजुरीचे पत्र देण्यात आले. तसेच गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ११ महिला बचतगटांना २२ लक्ष ५० हजार रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आले.बचतगटांच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणाला मदत मिळाली आहे. शेती व्यवसायासाठी देखील बचतगटातील महिला घरच्या कर्त्या पुरुषाला मदत करीत आहे.शेळी पालन,मत्स्य पालन यासह अनेक योजना आहेत.बचतगटातील महिलांनी कोणत्या योजनांचा लाभ घ्यावा हे त्यांनीच ठरवावे.-सीमा मडावी, जि.प.अध्यक्ष.......................पूर्वी महिला चुल आणि मुल या पुरतेच मर्यादित होत्या, पण आज त्या सर्वच क्षेत्रात काम करीत आहे. महिलांनी स्वत:च्या आरोग्यासह कुटूंबाच्या आरोग्याकडे देखील लक्ष दयावे.- लता दोनोडे, जि.प.सभापती.......................बचतगटातील महिलांनी बचतगटाअंतर्गत मिळणाºया कर्जातून उद्योग व्यवसाय सुरु करुन प्रगती साधावी.कुटूंबाच्या प्रगतीत महिलांचे योगदान महत्त्वपूर्ण असून त्यासाठी महिलांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करावीे.- डॉ. प्रा. सविता बेदरकर, सामाजिक कार्यकर्त्या........................प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या निमित्ताने महिला आज या मेळाव्याला एकत्र आल्या आहेत.माविमच्या माध्यमातून महिला आता सक्षम होत आहे. प्रत्येक क्षेत्रात महिलांनी पुढे आले पाहिजे.महिलांनी एकमेकींना पुढे नेण्यास हातभार लावला पाहिजे.- भावना कदम, नगरसेविका

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल