शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

कवलेवाडा जिल्हा परिषद क्षेत्रात चौरंगी लढत होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2021 10:09 PM

तिरोडा तालुक्यातील कवलेवाडा जिल्हा परिषद क्षेत्र असून नामाप्र असल्याने या जिल्हा परिषद क्षेत्राची चौरंगी लढत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कोणत्याही राजकीय पक्षाची आघाडी दिसून येत नसल्याने सध्या भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि प्रहार ही चारही पक्ष आपापले स्वतंत्र उमेदवार निवडणुकीत उभे करण्याच्या तयारीत असल्याने ही लढत चारही पक्षांच्या उमेदवारांमध्ये होणार हे निश्चित. यात काट्याची टक्कर होण्याची शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंडीकोटा : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी अद्यापही युती किवा आघाडी यासंदर्भात कुठलाच निर्णय झालेला नाही. त्यातच सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी एकला चलो रे चा सूर सुरुवातीपासूनच आवळा आहे. त्यामुळे काही ठिकाणी तिरंगी तर काही ठिकाणी चौरंगी लढतीचे चित्र दिसून आहे. तिरोडा तालुक्यातील कवलेवाडा जि. प. क्षेत्र नामाप्र असल्याने या जि. प. क्षेत्रात चांगलीच लढत होणार असून चौरंगी लढत होणार असल्याची चर्चा मतदारांमध्ये आहे. तिरोडा तालुक्यातील कवलेवाडा जिल्हा परिषद क्षेत्र असून नामाप्र असल्याने या जिल्हा परिषद क्षेत्राची चौरंगी लढत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कोणत्याही राजकीय पक्षाची आघाडी दिसून येत नसल्याने सध्या भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि प्रहार ही चारही पक्ष आपापले स्वतंत्र उमेदवार निवडणुकीत उभे करण्याच्या तयारीत असल्याने ही लढत चारही पक्षांच्या उमेदवारांमध्ये होणार हे निश्चित. यात काट्याची टक्कर होण्याची शक्यता आहे. कवलेवाडा क्षेत्राकरीता सर्व राजकीय पक्ष स्वतंत्रपणे आपापली उमेदवार रिंगणात उतरविण्याच्या तयारीत आहे. पक्षाचे कार्यकर्ते कामाला लागल्याने दिसून येत आहे. विविध कार्यक्रमामधील नेत्यांच्या होणाऱ्या गर्दीवरुन दिसून येत आहे. यातूनच निवडणुकांच्या चर्चेला ऊत आले आहे. या क्षेत्रातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. कोण उमेदवार सरस राहील हा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. प्रत्येक गावातील पानटपऱ्यांवर निवडणुकीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. सर्व राजकीय पक्ष आपापली उमेदवार या जि. प. क्षेत्रातील निवडणुकीत पूर्ण शक्तीनिशी उतरविण्याच्या तयारीत दिसून येत आहे. कार्यकर्तेसुद्धा निवडणूक कार्यासाठी सज्ज झाली आहेत. कवलेवाडा या जिल्हा परिषद क्षेत्रातील होणाऱ्या चौरंगी लढतीत कोणाला फायदा होणार हे निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होईल. सध्यातरी या परिसरात गावागावात निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. कोणत्याही पक्षाची आघाडी नसल्याने निवडणुकीत चांगलीच चुरस हाेणार असल्याचे दिसून येत आहे. या परिसरात कवलेवाडा व मुंडीकोटा हे दोन्ही गावे मोठी आहेत. त्यामुळे सर्वाच्या नजरा कवलेवाडा जि. प. क्षेत्राकडे लागल्या आहेत.

 

टॅग्स :ZP Electionजिल्हा परिषद