शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

रंगमंचावरुन कुठलेही कार्यकम होणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 4:54 AM

सालेकसा : कोरोना संकटामुळे यंदा कचारगड यात्रा होणार की नाही याबद्दल भाविकांमध्ये संशय असून अद्याप प्रशासनाने याबद्दल परवानगी दिली ...

सालेकसा : कोरोना संकटामुळे यंदा कचारगड यात्रा होणार की नाही याबद्दल भाविकांमध्ये संशय असून अद्याप प्रशासनाने याबद्दल परवानगी दिली नाही. तरी सुद्धा आदिवासींचे श्रद्धास्थान असलेल्या कचारगड येथे माघ पौर्णिमा निमित्त कोयापुनेमी महापूजा नक्की होणार आहे. परंतु यात्रादरम्यान येथे रंगमंचावरुन कसलेही सांस्कृतिक-धार्मिक कार्यक्रमांसह सभासंमेलन व इतर गर्दी वाढविणारे कार्यक्रम होणार नाही, असा निर्णय कचारगड समितीने घेतला आहे.

संपूर्ण देशभरातील आदिवासी गोंड समाजाचे उगमस्थळ व प्रमुख श्रद्धास्थान असलेले तालुक्यातील कचारगड देवस्थान माघ पौर्णिमेला आदिवासी बंधू भगिनींसाठी महत्वाचे असून येथे वर्षातून एकदा कोयापूनेमी (माघपौर्णिमा) निमित्त आवर्जून उपस्थित राहून आपल्या पूर्वजांना नमन व स्मरण करुन जातात. ही ५ दिवसीय यात्रा विविध आयोजनांनी रंगलेली असते. तसेच कचारगड हे देवस्थान नैसर्गिक स्थळी मोठ्या पर्वतरांगेत स्थापित असून येथे आशिया खंडातील सर्वात मोठी गुफा असून इतर छोट्यामोठ्या अनेक नैसर्गिक गुफांची शृंखला कायम आहे. वर्षानुवर्षे लोकांंना आकर्षित व आश्चर्यचकित करणाऱ्या या गुफा आहेत. त्यामुळे कचारगडला गैरआदिवासी पर्यटक सुद्धा मोठ्या संख्येने येतात. अशता या ५ दिवसात दरवर्षी मोठा जनसागर उसळत असतो.

परंतु यंदा कोरोना संकट असून देशातील विविध राज्यातील भाविक येऊन गर्दी वाढवतील तर निश्चितच कोरोनाचे संक्रमण वाढू शकते. मोठ्या प्रमाणात कम्युनिटी स्प्रेड होऊन पूर्ण देशात कोरोना संक्रमण वाढविण्यास पोषक ठरु शकते. अशात गर्दी टाळणारे कार्यक्रम होऊ न देणे यावर अधिक भर देण्यात येत आहे. त्यामुळे यंदा महासंमेलन, गोंडवाना महासभा, राजकारणी लोकांचे कार्यक्रम, धार्मिक प्रवचन व रात्रीचे सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

---------------------------------

पाच दिवस चालणार महापूजा

यंदा कोरोनामुळे गर्दी करणारे कार्यक्रम रद्द करण्यात आले तरी यात्रेचे पाच दिवस कोयापुनेमी महापूजा केली जाणार आहे. गोंड राजे गोंडी धर्माचार्य आणि गोंडी भूमकाल यांच्या हस्ते विधिवत पूजा करुन गोंडीध्वज फडकवून महापूजा व कचारगड यात्रेला सुरुवात केली जाईल. बाहेरुन कुणी आले नाही तर कचारगड देवस्थान समितीच्या अध्यक्षांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येईल. कचारगड यात्रेत येणारे भाविक आपल्या प्रथा परंपरेनुसार नैसर्गिक पूजा करतील आणि जातील. यात त्यांना कुठल्याही प्रकारची गर्दी करता येणार नाही. यासाठी इतर प्रांतातून आलेले भाविक गरज पडल्यास रात्री मुक्काम करु शकतील.

------------------------------------

यात्रेसाठी शासनाच्या परवानगीची वाट

येत्या २५ फेब्रुवारी ते १ मार्चदरम्यान चालणाऱ्या कचारगड यात्रेची परवानगी मिळावी म्हणून कचारगड देवस्थान समितीने प्रशासनाकडे अर्ज केला आहे. परंतु आतापर्यंत परवानगी मिळाली नसून आदिवासी भाविक काहीसे अस्वस्थ झाले आहेत. पारंपरिक देवपूजा खंडित होऊ नये म्हणून समितीतर्फे सतत प्रयत्न केले जात आहेत. परवानगी मिळाली तरी येणाऱ्या भाविकांना थांबविणे अशक्य आहे. माघ पौर्णिमानिमित्त भाविक येऊन आपली पारंपरिक नैसर्गिक पूजा करणारच. अशात प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही अटींच्या आधारे परवानगी देणे योग्य ठरेल. गुरुवारी (दि.१८) तहसील कार्यालयात समितीला पाचारण करुन सभा घेण्यात येईल. यावेळी वरील बाबीवर चर्चा केली जाईल व परवानगीबाबत निर्णय घेतला जाईल.

कोट.....

कचारगड यात्रेदरम्यान आदिवासी गोंड समाजाचे लोक आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ महापूजा करण्यासाठी वर्षातून एकदा आवर्जून येतात. देशातील इतर धार्मिक स्थळ उघडण्याची परवानगी मिळाली आहे तर कचारगड यात्रेसाठीसुद्धा प्रशासनाने सहकार्य करावे. दरम्यान दिलेल्या अटींचे निश्चित पालन केले जाईल.

- दुर्गाप्रसाद कोकोडे

अध्यक्ष, कचारगड देवस्थान समिती

कोट.....

कचारगड यात्रेत महापूजानिमित्त येणाऱ्या भाविकांनी कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता नियमित मास्कचा वापर करीत फिजिकल डिस्टंन्सिंगचे पालन व सॅनिटायजर्सचा वापर करावा, तसेच गर्दी करणे टाळावे.

- संचालक मंडळ

कचारगड यात्रा आयोजन समिती, धनेगाव