आॅनलाईन लोकमतआमगाव : शहराच्या ह्दयस्थळी असलेल्या स्टेट बँकेच्या कार्यालयात चोरट्यांनी रोख व दागिने शोधण्यासाठी एक तास घालविला. बँकेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी चोरट्यांच्या या सर्व हालचाली कैद केल्या असून चोरट्यांचे फुटेजही पोलिसांच्या हाती लागले आहे.भारतीय स्टेट बँकेच्या येथील शाखा कार्यालयात शुक्रवारी (दि.८) मध्यरात्री चोरीचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली. चोरट्यांनी बँकेच्या मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. मात्र असे करताना त्यांनी प्रवेशद्वाराजवळील कॅमेरा व केबल तोडून समोरच्या नालीत टाकले होते. चोरट्यांनी आपली ओळख लपविण्यासाठी चांगलीच हुशारी दाखविली व मात्र आतमध्ये असलेल्या कॅमेरांनी मात्र त्यांना टिपले.चोरट्यांनी आत प्रवेश केल्यानंतर रोख व दागिणे मिळविण्यासाठी लॉकर तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यात यश आले नाही. त्यानंतर पहिल्या माळ््यावरील कार्यालयातही त्यांनी अनेक ठिकाणी रोख व दागिने शोधले असल्याचे सीसीटिव्ही कॅमेºयांनी टिपले.यात दोन तरूण कार्यालयात शोधाशोध करीत असल्याचे फुटेज असून हा प्रकार रात्री १.३० ते २.३० पर्यंत सुरू होता. म्हणजेच या चोरट्यांनी बँकेत एक तास घालविल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांच्या हाती हे फुटेज लागले असून पोलिसांनी तपासाला गती दिली अहे. मात्र बँकेत चोरीच्या या धाडसी घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
चोरट्यांनी बँकेत घालविला एक तास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 9:50 PM
आॅनलाईन लोकमतआमगाव : शहराच्या ह्दयस्थळी असलेल्या स्टेट बँकेच्या कार्यालयात चोरट्यांनी रोख व दागिने शोधण्यासाठी एक तास घालविला. बँकेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी चोरट्यांच्या या सर्व हालचाली कैद केल्या असून चोरट्यांचे फुटेजही पोलिसांच्या हाती लागले आहे.भारतीय स्टेट बँकेच्या येथील शाखा कार्यालयात शुक्रवारी (दि.८) मध्यरात्री चोरीचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली. चोरट्यांनी बँकेच्या मुख्य ...
ठळक मुद्देसीसीटीव्हीने केले कैद : रोख व दागिने शोधण्याचा प्रयत्न