शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
2
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
3
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
4
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
5
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
6
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
7
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
8
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
9
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
10
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
11
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
12
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
13
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
14
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
15
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
16
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
17
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
18
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
19
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
20
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय

साडेतेरा हजार मतदार वगळले

By admin | Published: April 19, 2015 12:47 AM

तिरोडा विधानसभा क्षेत्रात गेल्या दोन दशकानंतर साडेतेरा हजार मतदार यादीतून कमी करण्यात आले आहेत.

तिरोडा विधानसभा क्षेत्र : अनेकांचे स्थलांतर, काहींचा मृत्यू तर काही नावे डबलतिरोडा : तिरोडा विधानसभा क्षेत्रात गेल्या दोन दशकानंतर साडेतेरा हजार मतदार यादीतून कमी करण्यात आले आहेत. या मतदारांमध्ये काही मृत मतदार तर अनेक जण स्थलांतरित झालेले होते. विशेष म्हणजे काही मतदारांची नावे पुन्हा पुन्हा दोन ठिकाणी होती त्यांचे दुसरे नाव यादीतून वगळण्यात आले. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकात मतदानाची टक्केवारी निश्चितपणे वाढणार आहे.भारतीय निवडणूक आयोगाकडून वर्षातून दोन वेळा पुनर्निरीक्षण कार्यक्रम आयोजित केले जातात. नव्याने मतदाराला समाविष्ट केले जात होते. मात्र २० वर्षापासून मृत, स्थलांतरित आणि दुबार मतदार वगळण्याचे कामे केले जात नव्हते. यामुळे मतदानाच्या वेळी मतदान अधिकाऱ्यांना त्रास सहन करावा लागत होता. त्याचबरोबर मतदानाची टक्केवारीसुद्धा कमी दिसून येत होती.तिरोडा विधानसभा क्षेत्रात तीन तालुक्यातील गावांचा समावेश असून एकूण बुथ संख्या २८८ आहे. गोरेगाव तालुक्याचे एकूण ७८ बुथ आहेत. गोंदिया ४५ आणि तिरोडा तालुक्यात १६५ बुथचा समावेश आहे. गोरेगाव क्षेत्रातील गावांमध्ये पुरुष २९४०१ व स्त्रिया मतदार २९८६४ अशी एकूण ५९ हजार २६५ मतदार संख्या आहे. गोंदिया आणि तिरोडा तालुक्यातील मतदार पुरुष ९० हजार १७९ व स्त्रिया ८९ हजार ८५३ आहे. संपूर्ण क्षेत्रात पुरुष १ लाख २१ हजार ३५४ आणि स्त्रिया मतदार १ लाख २१ हजार ८३९ असे एकूण २ लाख ४३ हजार १९३ मतदार आहेत. दोन वर्षापूर्वी (२०१३) विधानसभा क्षेत्राची मतदार संख्या २ लाख २३ हजार ९७८ इतकी होती. २०१४ च्या मतदान यादीतील बोगस नावे १३ हजार ५२६ नावे वगळल्याने आणि आतापर्यंत नवीन नावे समाविष्ट केल्यानंतर मतदारांचा आकडा २ लाख २७ हजार ७६७ एवढा झाला आहे. येणाऱ्या निवडणुकीत मतदार प्रक्रियेदरम्यान मतदानाची टक्केवारी अधिक दिसून येईल. त्याचबरोबर मतदान अधिकाऱ्यांना तसेच उमेदवारांना सुद्धा निवडणुकीचे गणित काढण्याकरिता अंदाज लागू शकेल. (प्रतिनिधी)‘लोकमत’ने आणले होते निदर्शनासगेल्या २२ आॅक्टोबरला ‘लोकमत’ने तिरोडा विधानसभा क्षेत्राच्या मतदार यादीत २० हजार मतदार बोगस असल्याचे वृत्त प्रकाशित केले होते. त्याची दखल सर्वत्र घेऊन मतदार यादीत समाविष्ट असणारे मृत, स्थलांतरित आणि दुबार मतदार काढण्याची मोहीम निवडणूक आयोगाने हाती घेतली. तरी देखील स्थलांतरीत मतदारांची संख्या हजारो असल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. कौटुंबिक सदस्य याबाबतची वास्तविकता लपवित असल्याने ही समस्या निर्माण होत आहे.असे वगळले मतदारवगळण्यात आलेल्या मतदारांत मृत मतदार ७९२८, स्थलांतरित मतदार ४६९८ आणि दुबार नावे असणारे मतदार ९०० असे एकूण १३ हजार ५२६ आहेत. यात पुरुष ७००४ आणि सित्रा ७९२८ आहेत. वास्तविक पाहता १४७४ आणि स्त्री मतदार २१२२ असे एकूण ३८९६ मतदार नव्याने समाविष्ट झाल्याने पूर्वी असलेल्या मतदार संख्येतून ११ हजार ३६ मतदार संख्या कमी झाली आहे.