तिरोडा : उपविभागीय अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी सात ट्रक अवैध गौणखनीज वाहतुकीच्या आरोपावरुन पकडले व तहसील कार्यालय पटांगणावर जमा केले. त्यांच्या कागदपत्राची तपासणी केली असता सातही ट्रकच्या रॉयल्टीवर ठप्पा होता पण स्वाक्षरी नव्हती. त्यामुळे त्या रॉयल्टीज खऱ्या की खोट्या याची चौकशी करण्यासाठी तहसीलदार तिरोडा यांना खनिकर्म अधिकारी नागपूर यांच्याकडे चौकशीसाठी पाठविले. त्याचा अहवालही आला, त्यात त्या रॉयल्ट्या खऱ्या असल्याचे आढळून आले. सात ट्रक अवैध खनिजाची वाहतुक संबंधाात पकडले होते. त्यात ट्रक क्र.एमएच३६/एफ-१४०१, एमए ३६/एफ-१२०१, एमएच ३६/एफ-१९०१, एमएच ३१/डीएस-७५५३, एमएच ४०/एके-७५५३, एमएच४०/एके-४३८९ तसेच सोबतचा आणखी एक ट्रक असे सात ट्रक पकडले. त्यांचेवर रात्री गौण खनिजाची वाहतुक करणे, गौण खनिजाची वाहतुक करताना झाकून न नेणे व रॉयल्टीवर स्वाक्षरी नसणे अशा आरोपावरून ट्रक मालकाकडून प्रत्येक १५४०० रुपये दंड अशा एकूण १ लाख ७ हजार ८०० रुपये दंड वसूल करण्यात आला. (तालुका प्रतिनिधी)
‘त्या’ सात ट्रक मालकांकडून १.७ लाखांचा दंड वसूल
By admin | Published: October 19, 2016 2:49 AM