शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

स्वत:चा पक्ष न सांभाळता येणाऱ्यांनी राजकारण सोडून द्यावे - सुधीर मुनगंटीवार

By अंकुश गुंडावार | Published: May 08, 2023 4:31 PM

"पक्ष फोडण्याचा डाव होता तर डाव होऊ देवू नका. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस फुटत आहे."

गोंदिया : शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी फोडण्याचा भाजपचा प्लान होता, असा आरोप ठाकरे गटाने सामनाच्या अग्रलेखातून केला होता. यावर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उत्तर दिले आहे. पक्ष फोडण्याचा डाव होता तर डाव होऊ देवू नका. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस फुटत आहे. जे नेते आपला पक्ष सांभाळू शकत नाही. आमदारांना सांभाळू शकत नाही ते नेते लायकीचे नसून त्यांनी राजकारण सोडून द्यावे, असा घणाघात राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी खा. संजय राऊतांवर केला.

सुधीर मुनगंटीवार हे सोमवारी (दि.८) गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. देवेंद्र फडणवीसांना सर्वोच्च न्यायालयाचा निकाल माहीत असेल, असे खा. शरद पवारांनी म्हटले होते. यावर मुनगंटीवार म्हणाले, जर सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आधीच माहित होत असतील तर कशाला पैसे खर्च करायचे? कोणीही व्यक्ती असा दावा करीत असेल तर आश्चर्य आहे. तर, सामना हे वृत्तपत्र नसून शिवसेनेचे पॅम्प्लेट आहे. सामना हे जर वृत्तपत्र असते तर त्याच्यामध्ये सामान्यांचे प्रश्न आले असते, अशी टीकाही त्यांनी ठाकरे गटावर केली आहे. दरम्यान, बिहार राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे खा. शरद पवार यांची मुंबईमध्ये येऊन भेट घेणार आहेत. यावर मुनगंटीवार यांना विचारले असता त्यांनी नितीश कुमार यांच्यावर टीका करत त्यांना स्वतःचे राज्य सांभाळत नाही. त्यांच्या राज्याचा प्रगतीचा वेग अजूनही कमी आहे. यांना मोदीजी नको आहेत. यांना स्वैराचारी सत्ता पाहिजे, असा निशाणा त्यांनी साधला आहे.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार