शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

‘ड्रंक अ‍ॅन्ड ड्राईव्ह’वर १० हजाराचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2019 11:49 PM

आता वाहतुकीचे नियम मोडल्यास दहापट अधिक दंड, अपघातग्रस्तांना नुकसान भरपाईची तरतूद असणारे बहुचर्चित मोटार वाहन विधेयक राज्यसभेत मंजूर झाले. लवकरच हे विधेयक राज्यात लागू होणार आहे.

ठळक मुद्देबहुचर्चित मोटार वाहन विधेयकाला मंजुरी : रस्ता सुरक्षेमध्ये आमूलाग्र बदलाची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आता वाहतुकीचे नियम मोडल्यास दहापट अधिक दंड, अपघातग्रस्तांना नुकसान भरपाईची तरतूद असणारे बहुचर्चित मोटार वाहन विधेयक राज्यसभेत मंजूर झाले. लवकरच हे विधेयक राज्यात लागू होणार आहे. या नव्या विधेयकात मद्यपान करून वाहन चालविल्यास १० हजार रुपये दंड, वाहन चालविताना मोबाईलवर बोलल्यास पाच हजार रुपये दंड, धोकादायक वाहन चालविल्यास पाच हजार रुपये दंड, परवाना नसताना वाहन चालविल्यास पाच हजार रुपये दंड केला जाणार आहे. यामुळे वाहतुकीचे नियम पाळले जाऊन अपघात कमी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.देशात ८० टक्के अपघात मानवी चुकांमुळे होतात. हे टाळण्यासाठी व बेशिस्त वाहनचालकांना चाप बसावा, या उद्देशाने मोटार वाहन विधेयकात अनेक दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सातत्याने या सुधारित मोटार वाहन विधेयकासाठी प्रयत्न चालविले होते. अखेर हे विधेयक संसदेत बुधवारी मंजूर झाले. यामुळे रस्ता सुरक्षेमध्ये आमूलाग्र बदल होण्याची अपेक्षा वर्तविली जात आहे. सोबतच वाहनांचे परवाने काढणे, त्यांची मुदत वाढवणे, वाहनांची नोंदणी यासारखी महत्त्वाची कामे आॅनलाईन पद्धतीने केली जाणार आहेत.अल्पवयीन मुलाचा हातून अपघात झाल्यास पालकांना तुरुंगवासअल्पवयीन मुले वाहन चालविताना आढळल्यास सध्या केवळ ५०० रुपये दंडाची तरतूद आहे. परंतु नव्या विधेयकात अल्पवयीन मुले वाहन चालविताना आढळून आल्यास थेट गाडीची नोंदणी रद्द होणार आहे. याशिवाय अल्पवयीन मुलाच्या हातून अपघात झाल्यास पालकांना तीन वर्षापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा आणि २५ हजार रुपये दंडाची तरतूद आहे. सध्याच्या कायद्यात ही तरतूद नव्हती.परवान्यासाठी शिक्षणाची अट रद्दपरवाना मिळविण्यासाठी पूर्वी आठवा वर्ग उत्तीर्ण असणे बंधनकारक होते. मात्र नव्या विधेयकात ही अटच काढून टाकण्यात आली आहे. यामुळे ड्रायव्हिंग स्कूलमधून मिळवलेल्या प्रमाणपत्राच्या आधारे वाहनचालक परवाना मिळवता येईल. शिवाय, परवान्याचे नूतनीकरण करण्यासाठी आता एक वर्षांची मुदत दिली जाणार आहे.‘ड्रंक अ‍ॅन्ड ड्राईव्ह’वर वचक बसेलदारू पिऊन वाहन चालविल्यास रस्त्यावरील अपघात वाढतात. यावर आळा घालण्यासाठी ‘ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह’ची कारवाई केली जाते. दोषी वाहनचालकांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन प्रकरण न्यायालयात दाखल होते. तीन हजार रुपयांचा दंडही आकारला जातो, असे असतानाही ही प्रकरणे कमी होताना दिसून येत नाही. दरवर्षी सुमारे २० हजारावर अशी प्रकरणे समोर येतात. परंतु नव्या कायद्यात १० हजाराचा दंड आकारला जाणार आहे.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीस