ऑनलाईन लोकमतगोंदिया : काही तेंदूपत्ता कंत्राटदारांनी सोमवारी (दि.१९) नवेगावबांध-नागझिरा या वन्यजीवांचे सर्वाधिक भ्रमण असणाऱ्या क्षेत्रातील जंगलात आग लावली. दरम्यान ही आग बुधवारी देखील कायम होती. या आगीचा फटका चार हजार हेक्टरमधील जंगलाला बसल्याची माहिती आहे. मात्र वन्यजीव, वन आणि वनविकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून अद्यापही या घटनेवर सावरासावर करण्याचा प्रयत्न केला जात आहे.नवेगावबांध-नागझिरा वन्य प्राण्यांसाठी बफर झोन म्हणून ओळखले जाते. या क्षेत्रातील क्षेत्र क्रमांक ५१२, ५१३, ५३२, ५३३, ५३५ मध्ये सोमवारी (दि.१९) आग लागली. दरम्यान या आगीची धग बुधवारी (दि.२१) तिसºया दिवशी सुद्धा कायम होती.या आगीमुळे नवेगावबांध-नागझिरा क्षेत्रातील कर्पांटमेंट क्रमांक ४९८, ४९९, ५११, ५३१, ५३२, ५३३, ५३४, ५३५, ५३६ मधील क्षेत्रातील वनसंपत्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या क्षेत्रात अनेक मौल्यवान वनस्पती आणि वन्यजीवांचा सर्वाधिक वावर असतो. मागील तीन दिवसांपासून या आगीची धग कायम असल्याने त्याचा वन्यजीवाला सुद्धा धोका पोहचण्याची शक्यता नाकारता येत नाही.दरम्यान वन्यप्राण्यासाठी बफर झोन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिसरात लागेल्या आगीची पाहणी करण्यासाठी वन्यजीव क्षेत्रात कार्यरत सेवा संस्थेच्या सदस्यांनी बुधवारी मुरदोली, दोडके, पुतळी, डुग्गीपार शशीकरण पहाडी, शेंडा कोयलारी, आलेबेदर, शेंडा कोयलारी, कोहळीपार, जांभळी, डोंगरगाव डेपो, झुंझाळी, खामतलाव, मुल्ला या युनिटला भेट देऊन पाहणी केली. तसेच जंगलात लागलेली आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. ज्या परिक्षेत्रात अद्यापही आग कायम आहे, त्या परिक्षेत्राची माहिती वन, वन्यजीव आणि वनविकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिली.ही आग तेंदूपत्ता कंत्राटदारांनी लावल्याचा आरोप सेवा संस्थेच्या सदस्यांनी केला. या प्रकाराकडे या विभागाचे अधिकारी हेतूपुरस्सर दुर्लक्ष करीेत आहे. मात्र यामुळे जैवविविधतेची हानी होत असल्याचे सावन बहेकार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.सेवा संस्थेची धडपडनवेगावबांध-नागझिरा या बफर झोन समजल्या जाणाऱ्या क्षेत्रातील आग विझविण्यासाठी सेवा संस्थेची चमू बुधवारी सकाळपासूनच या क्षेत्रात रवाना झाली. तसेच नेमक्या कोणत्या परिक्षेत्रात आग लागली आहे याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचे सेवा संस्थेचे अध्यक्ष बहेकार यांनी सांगितले.मनुष्यबळाचा अभावनवेगावबांध-नागझिरा या बफर झोन क्षेत्रात लागलेल्या आगीची माहिती वन्यजीव प्रेमी संस्थेच्या सदस्यांनी वन, वन्यजीव आणि वनविकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिली. तसेच अद्यापही काही भागात आग कायम असल्याचे सांगितले. यावर या विभागाच्या अधिकाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी मनुष्यबळ आणि आवश्यक साधन सामुग्रीचा अभाव असल्याचे सांगितले. मात्र यासर्व प्रकारामुळे कोट्यवधी रुपयांच्या मौल्यवान वनसंपत्तीचे नुकसान होत आहे.समन्वय नाहीवन, वन्यजीव आणि वनविकास महामंडळाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याची बाब नवेगावबांध-नागझिरा क्षेत्रात लागलेल्या आगीच्या घटनेनंतर स्पष्ट झाली. या तिन्ही विभागाचे क्षेत्र एकमेकाला लागून असून त्यांनी वेळीच उपाययोजना केल्यास अशा घटनांना आळा बसू शकतो.
आगीमुळे हजारो हेक्टर क्षेत्र प्रभावित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 9:30 PM
काही तेंदूपत्ता कंत्राटदारांनी सोमवारी (दि.१९) नवेगावबांध-नागझिरा या वन्यजीवांचे सर्वाधिक भ्रमण असणाऱ्या क्षेत्रातील जंगलात आग लावली.
ठळक मुद्देतिन्ही विभागात समन्वयाचा अभाव : तेंदूपत्ता कंत्राटदारांना अभय, मौल्यवान वनस्पती खाक