लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहरात शुध्द पाणीपुरवठ्याचा विषय ज्वलंत असतानाच खोदकामादरम्यान जलवाहिनी फुटली. यात हजारो लिटर पाणी व्यर्थ वाहून गेले. हा प्रकार भंडारा शहरातील खांबतलाव चौक ते शास्त्रीनगर चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर घडला. विशेष म्हणजे दोन दिवसांपासून पाणी वाया गेले. दरम्यान रविवारी दुपारच्या सुमारास जलवाहिनीची दुरुस्ती करण्यात आली.शहरात वाढीव पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जलवाहिनी घालण्याचे कार्य सुरु आहे. अनेक ठिकाणी खोदकाम सुरु असल्याने लहान मोठे प्रसंग उद्भवतात. यात कधी दूरध्वनी केबल उखडने, नळधारकांना जोडणी दिलेले जलवाहिनी तुटणे, अंतर्गत विद्युत केबल खराब होणे आदी समस्या उद्भवत आहेत. अशाच प्रकार देशबंधु वॉर्डाकडे जाणाऱ्या चौकात घडला. जलवाहिनी घालण्यासाठी खोदकाम करीत असतांना पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली. शनिवारीही शेकडो लिटर पाणी जलवाहिनीतून बाहेर निघून रस्त्यावर वाहून गेले. रविवारीही सकाळी नळ आल्यानंतर हीच स्थिती होती.पाऊस बरसल्यावर जसे पाणी वाहून जाते तसे रस्त्यावरुन जोरदार प्रवाहात वाहत होते. जलकुंभातून निघून नळधारकांना पाणी मिळणे अपेक्षीत होते. मात्र जलवाहिनीच फुटल्याने शनिवार व रविवारला परिसरातील नळधारकांना पाण्याचा पुरवठा होऊ शकला नाही. याबाबत येथील स्थानिक रहिवाश्यांनी पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला केली. मात्र याची शनिवारी याची डागडुजी करण्यात आली नाही. मात्र दुपारी जलवाहिनीची दुरुस्ती करण्यात आली. उशिरा का असेना दुरुस्ती झाली असली तरी दोन दिवसपर्यंत मात्र हजारो लिटर पाणी वाया गेले. आधीच शहरात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरु आहे. अशावेळी जलवाहिनीच्या कामात दिरंगाई नागरिकांच्याच जिव्हारी लागते.
हजारो लिटर पाण्याची नासाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 5:00 AM
शहरात वाढीव पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जलवाहिनी घालण्याचे कार्य सुरु आहे. अनेक ठिकाणी खोदकाम सुरु असल्याने लहान मोठे प्रसंग उद्भवतात. यात कधी दूरध्वनी केबल उखडने, नळधारकांना जोडणी दिलेले जलवाहिनी तुटणे, अंतर्गत विद्युत केबल खराब होणे आदी समस्या उद्भवत आहेत. अशाच प्रकार देशबंधु वॉर्डाकडे जाणाºया चौकात घडला.
ठळक मुद्देदोन दिवसानंतर दुरुस्ती : खोदकामावेळी फुटली जलवाहिनी, नागरिकांना त्रास