नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : प्रगत शैक्षणीक महाराष्ट्रासाठी काम करतांना शाळेत कधीच न गेलेली किंवा शाळेत सतत महिनाभर गैरहजर असलेल्या बालकांना शाळाबाह्य मुले म्हणून संबोधले जाते. सन २०१८-१९ या वर्षात राज्यात तब्बल ३५ हजार ३०४ बालके शाळाबाह्य आढळली आहेत. त्यांना आता मुख्य प्रवाहात येण्यासाठी विशेष प्रशिक्षण दिले जात आहे.प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत १०० टक्के मुले शाळेत दाखल करावे. कुणीही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून शाळाबाह्य मुलांची शोध मोहीम राज्यभर शिक्षण विभागाने केली. या मोहीमेत सन २०१८-१९ या वर्षात ३५ हजार ३०४ बालके शाळाबाह्य आढळलीत. त्यापूर्वीच्या शोध मोहीमेत सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात राज्यभरात ७८ हजार ५०१ मुले ही शाळाबाह्य आढळली होती. सर्व शिक्षा अभियानातून संपादणूक पातळी गाठण्याकरिता विशेष शैक्षणिक सहाय्य देण्याकरिता विशेष प्रशिक्षण देण्याची जवाबदारी शिक्षण हक्क कायद्याने शिक्षण विभागावर बंधनकारक आहे. शाळाबाह्य मुलांच्या शिक्षणासाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना बालरक्षक म्हणून कार्य करण्याची संधी दिली आहे. या मुलांना वाचन-लेखन व गणितातील मुलभूत क्रिया अवगत होण्याकरिता महाराष्टÑ विद्या प्राधिकरणाने विकसित केलेल्या शैक्षणिक कृती आराखड्यातच उपयोग करण्यात यावा, यासाठी शिक्षकांनी त्यानुसार स्वत:ला अधिक समृद्ध करावे, अश्या सूचना देण्यात आल्या आहेत.या शाळाबाह्य मुलांच्या प्रशिक्षणासाठी शाळामध्ये यापूर्वी भाषा, गणित, विज्ञान शैक्षणिक साहित्य संघ व अन्य शैक्षणिक पूरक साहित्य उपलब्ध करुन दिले आहेत. त्याचा विशेष प्रशिक्षणासाठी उपयोग करावा, तसेच महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांनी यापूर्वी विशेष प्रशिक्षणाकरीता शाळांसाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन दिले आहे.त्याचा ही वापर अध्यापनात करण्यात यावा.त्यानुसार त्यांना वयानुरुप समकक्ष वर्गात दाखल करुन विशेष प्रशिक्षण देण्यात यावे. याव्यतिरीक्त आपल्या जिल्हा परिषद व महानगरपालिका क्षेत्रामध्ये शाळाबाह्य मूल आढळून आल्यास त्यांनाही ही सुविधा उपलब्ध करुन द्यावी.राज्यात बालरक्षक चळवळ जोमाने कार्यान्वित असून राज्यातील सर्वच शिक्षकांनी बालरक्षकाच्या भूमिकेतून संवेदनशिलतेने काम केल्यास राज्यात एकही बालक शाळाबाह्य राहणार नाही. त्यानुसार नियोजनपूर्वक काम आपल्या स्तरावर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. विद्या प्राधिकरणातील मराठी,गणित, विज्ञान, इंग्रजी, उर्दू, सामाजिक शास्त्र या विभागांमार्फत राज्यातील मुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाते. त्यांच्या माध्यामतून वयानुरुप शाळेत प्रवेशित झालेल्या मुलांचे विशेष प्रशिक्षण घेण्यास मदत होईल. यासाठी विद्या प्राधिकरणातील विविध विभागाकडून राबविण्यात येणारे उपक्रम, प्रशिक्षणाच्या माध्यमातून शाळेत वयानुरुप दाखल होणाºया मुलांच्या शिकण्यासाठी विविध उपक्रमाची मदत होईल.सरल या प्रणालीत शाळेत पटावर दाखल असलेल्या परंतु मध्येच शाळा सोडून गेलेल्या अनियमित मुलांची माहिती व शाळाबाह्य बालकांबाबत संकेतस्थळावरील ड्राप बॉक्समध्ये उपलब्ध करुन देण्यात येते. या मुलांचा शोध घेऊन त्यांना नजीकच्या शाळेत नियमित हजर राहण्यासाठी बालरक्षक हे प्रभावी माध्यम आहे. शाळाबाह्य मुुलांच्या शिक्षणाशी संबंधीत यशोगाथा, केस स्टडीज,व्हिडीओज अशा उल्लेखनीय बाबीचे मराठी व इंग्रजामध्ये दस्तऐवजीकरण करुन या कार्यालयास सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.या जिल्ह्यात असे आढळले शाळाबाह्य मुलेसन २०१८-१९ या वर्षात अहमदनगर जिल्ह्यात १०६७, अकोला ६३५, अमरावती ९१२, औरंगाबाद २५५, बीड १७७१, भंडारा ३६४, बुलढाणा ४३८, चंद्रपूर ४२६, धुळे ९०९, गडचिरोली २४७, गोंदिया २०१, हिंगोली ६५९, जळगाव १४९३, जालना २८८, कोल्हापूर ५९०, लातूर १६९, मुंबई उपनगर ४८४, मुंबई मनपा ७३२, नागपूर १८५, नांदेड ७१५, नंदुरबार ३५२७, नाशिक ३४८९, उस्मानाबाद २०८, परभनी ७२३, पालघर २१७७, पुणे ३७६१, रायगड ६९०, रत्नागीरी ३३९, सांगली ५०२, सातारा १०५३, सिंधुदुर्ग ६५२, सोलापूर ६५०, ठाणे ४४८१, वर्धा २१, वाशिम २०६, यवतमाळ २८५ अशी शाळाबाह्य बालके आढळली आहेत.शिक्षण विभागात अनेक चळवळराज्यात डिजीटल शाळा, तंत्रस्नेही शिक्षक, प्रगत शाळा, स्पोकन इंग्लिश, शाळा सिद्धी, समाज सहभाग, वाचन प्रेरणा दिवस यासारख्या चळवळी सुरु आहेत.यातून साध्य होणाºया परिणामांचा लाभ या मुलांनाही व्हायला हवे यादृष्टीने योग्य नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र विद्या प्राधिकरण, पुणे यांचेकडून भाषा व गणित या विषयातील संकल्पना समृद्धीकरण्यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येत आहे.यामध्ये शैक्षणिक साहित्याच्या प्रभावी वापरातून प्रत्येक मूल निर्धारित संगणवणूक पातळी गाठू शकेल याचे नियोजन करण्यात आले आहे.
राज्यात आढळली ३५ हजार शाळाबाह्य मुले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 6:00 AM
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत १०० टक्के मुले शाळेत दाखल करावे. कुणीही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून शाळाबाह्य मुलांची शोध मोहीम राज्यभर शिक्षण विभागाने केली. या मोहीमेत सन २०१८-१९ या वर्षात ३५ हजार ३०४ बालके शाळाबाह्य आढळलीत. त्यापूर्वीच्या शोध मोहीमेत सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात राज्यभरात ७८ हजार ५०१ मुले ही शाळाबाह्य आढळली होती.
ठळक मुद्देमुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रशिक्षण : ठाण्यात आढळली सर्वाधीक शाळाबाह्य बालके