लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी करण्यासाठी आलेल्या मेडिकल कौन्सिलच्या चमूने त्यांच्या अहवालात येथील सोयी सुविधांवर नाराजी व्यक्त केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची तिसºया वर्षाची मान्यता धोक्यात आली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपलब्ध सोयी सुविधांचा आढावा घेण्यासाठी मेडिकल कौन्सिलची चमू ३० आॅगस्ट रोजी गोंदिया येथे आली होती. या चमूने तीन दिवस गोंदियात मुक्काम करुन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सोयी सुविधांचा आढावा घेतला. तसेच रजेगाव येथील ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली होती. या मेडिकल कौन्सिलच्या चमूमध्ये जयपूर येथील डॉ.राकेशकुमार माहेश्वरी, बंगरुळ येथील डॉ.के.एस.वेदराजू, आसाम येथील डॉ.जयश्रीदेवी यांचा समावेश होता. या चमूने केटीएस, बाईगंगाबाई स्त्री रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या वसतिगृह तसेच कर्मचाºयांसाठी तयार केल्या जाणाºया निवास्थानाच्या जागेची पाहणी केली.या चमूने येथील बारीक सारीक गोष्टींचा आढावा घेतला होता. मेडिकल कौन्सिलच्या चमूने दिलेल्या अहवालावरच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या तिसºया वर्षाची मान्यता अवलंबून असते. त्यामुळे समिती येण्यापूर्वी वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने सर्व काही आलबेल असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला. मात्र तो प्रयत्न फसल्याची बाब पुढे आली आहे. मेडिकल कौन्सिलच्या चमूने येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सोयी सुविधांवर नाराजी व्यक्त केल्याच्या गोष्टीला खासदार नाना पटोले यांनीही दुजोरा दिला.रिक्त पदे, सोयी सुविधांवर नाराजीयेथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर आणि इतर कर्मचाºयांची जेवढी पदे मंजूर करण्यात आली. तेवढी पदे अद्यापही भरण्यात आली नाही. ३० ते ४० टक्के पदे रिक्त आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ज्या सुविधा असण्याची गरज आहे. नेमक्या त्याच सुविधा नाही. इमारतींचे बांधकाम देखील अपूर्ण आहे. यासर्व गोष्टींची मेडिकल कौन्सिलच्या चमूने गांभीर्याने दखल घेत त्यावर नाराजी व्यक्त केली आहे. तसे त्यांच्या अहवालात नमूद केल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाºयांने दिली.
वैद्यकीय महाविद्यालयाची मान्यता धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 10:08 PM
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी करण्यासाठी आलेल्या मेडिकल कौन्सिलच्या चमूने त्यांच्या अहवालात येथील सोयी सुविधांवर नाराजी व्यक्त केल्याची .....
ठळक मुद्देमेडिकल कौन्सिलची नाराजी : सोयी सुविधांचा अभाव