ऑनलाईन लोकमतआमगाव : आमगाव वन परिक्षेत्रातर्गंत येणाऱ्या मानेगाव क्षेत्रातील खुर्शीपार जंगलात तीन हरिणांची शिकार अज्ञात शिकाऱ्यांनी केल्याची घटना शनिवारी (दि.१७) सकाळी उघडकीस आली. दरम्यान या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.प्राप्त माहितीनुसार मानेगाव हे जंगलव्यापत क्षेत्र असून शुक्रवारी (दि.१६) एक शेतकरी जंगलाच्या मार्गाने शेतात जात असताना खुर्शीपार येथील गौरीशंकर ठाकरे यांच्या शेतशिवारात तीन हरिण मृतावस्थेत आढळले.त्यांनी याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी ताफ्यासह पोहचले. तेव्हा त्यांना तीन हरिण मृदावस्थेत पडून असल्याचे आढळले. त्यापैकी दोन हरिणांचे शिंगे कापलेले आढळले.मृत हरिणांची स्थिती पाहता, त्यांचा विजेच्या प्रवाहाने मृत्यू झाला नसावा. तर त्यांचा मृत विष बाधेमुळे झाला असावा असा अंदाज वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चन्ने यांनी व्यक्त केला. हरिणांची शिकार करणाऱ्या अज्ञात आरोपींचा शोध घेण्यास पथके रवाना केली आहे.मात्र तीन हरिणांपैकी दोन हरिणांचे शिंगे गायब असल्याने कदाचित जादूटोण्यासाठी या हरिणांची शिकार तर करण्यात आली नाही ना अशी शक्यता वर्तविली जात आहे.दोन दिवसांपूर्वीची घटना ?खुर्शीपार जंगलात तीन हरिणांची शिकार झाल्याची घटना गुरूवारी घडल्याची चर्चा आहे. याची माहिती सुध्दा वनविभागाच्या अधिकाऱ्यांना होती. मात्र त्यांनी ही बाब उशीर उघडकीस आणल्याची चर्चा आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी वन्यजीवप्रेमींनी केली आहे.
खुर्शीपार जंगलात तीन हरणांची शिकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 11:20 PM