शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

तीन घरे जळून लाखोंची हानी

By admin | Published: April 05, 2017 12:58 AM

तालुक्यातील ओवारा ग्राम पंचायतअंतर्गत येत असलेल्या चांदलमेटा येथे सोमवारी (दि.३) रात्री ७.२० वाजता विद्युत ....

चांदलमेटा येथील प्रकार : पुराम यांची दिला धीर, मदत मिळवून देण्याचे आश्वासन देवरी : तालुक्यातील ओवारा ग्राम पंचायतअंतर्गत येत असलेल्या चांदलमेटा येथे सोमवारी (दि.३) रात्री ७.२० वाजता विद्युत मिटरच्या वायरींगमध्ये झालेल्या शॉर्टसर्किटमुळे तीन परिवारांच्या घराला आग लागून संपूर्णत: तिन्ही घरांची राखरांगोळी झाली आहे. सुदैवाने जीवितहानी टळली. प्राप्त माहितीनुसार, देवरी ते आमगाव रोडवरील डोंगरगावच्या बाजूला असलेल्या आणि ओवारा ग्राम पंचायतअंतर्गत येत असलेल्या चांदलमेटा येथील केशवराव वल्के, जियालाल वल्के आणि बाबुलाल वल्के या तिन्ही भावांचे संयुक्त चाळीसारखे मातीचे घर आहे. यात तिन्ही मिळून संयुक्त पध्दतीने एकच विद्युत मिटर होता. घटनेच्या वेळी म्हणजे सोमवार (दि.३)च्या सायंकाळी ७.२० वाजता उन्हाळ्याच्या गरमीमुळे सर्व जण बाहेरील अंगणात बसले होते. त्याच वेळेस शार्टसर्कीटमुळे अचानक मिटरला जोडलेल्या वायरींगला आग लागली. ही आग काही परिवारातील इतर घरांना लागली. या अग्नीतांडवात पुरुष आणि महिलांच्या अंगावर असलेले कपडे तेवढे शिल्लक राहीले, मात्र घरातील कपडे, दागिने, रोख राशी, कागदपत्रे, शालेय दप्तर, पुस्तक आणि अन्न धान्य असे सर्वच जळून खाक झाले. एका भावाकडील तर सेवानिवृत्तीचे आणि लग्नासाठी जुळवलेले दोन लाख रुपये जळाल्याची चर्चा आहे. सरपंच कमल येरणे यांना माहित होताच आपल्या मित्रांसह रात्रीच दहा वाजेपासून परिस्थितीवर नजर ठेवून होते. मंगळवारला आ.संजय पुराम यांनी घटनास्थळी भेट देऊन तात्पुरती पाच हजारांची मदत केली. तसेच शासनाकडून योग्य ती जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. गावकरी मंडळीकडून सुध्दा पुढील एक आठवड्याची भोजन सामुग्री जमा करून निवासाची सुध्दा व्यवस्था करण्यात आली आहे. शासनाकडून नायब तहसीलदार बारसे आणि मंडळ अधिकारी यांनी घटनेचा पंचनामा केला आहे. यात सर्व मिळून २० ते २५ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. (प्रतिनिधी)