शहरं
Join us  
Trending Stories
1
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
2
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
3
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
4
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
5
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
6
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
8
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
9
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
10
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
11
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
12
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
13
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
14
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
15
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
16
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
17
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
18
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
19
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल

तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या मजुरांवर अस्वलाचा हल्ला; तीन जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2022 5:06 PM

हे तिन्ही मजूर गुरुवारी सकाळी तेंदूपत्ता तोडण्यासाठी गावालगत असलेल्या जंगलात गेले होते.

ठळक मुद्देडोंगरगाव वन परिक्षेत्रातील घटना

इसापूर (गोंदिया) : तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात गेलेल्या तीन मजुरांवर एका अस्वलाने हल्ला करून गंभीर जखमी केले. ही घटना गुरुवारी (दि. १९) सकाळी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठगाव वनपरिक्षेत्रांतर्गत डोंगरगाव जंगल परिसरात घडली.

बुधराम उईके, समीर उईके, राजीराम उईके (रा. डोंगरगाव) अशी अस्वलाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मजुरांची नावे आहेत. सध्या जिल्ह्यात तेंदूपत्ता तोडणीचा हंगाम सुरू आहे. ग्रामीण भागातील अनेकजण कुटुंबासह पहाटेपासून जंगलात तेंदूपत्ता तोडणीसाठी जातात. डोंगरगाव येथील हे तिन्ही मजूर गुरुवारी सकाळी तेंदूपत्ता तोडण्यासाठी गावालगत असलेल्या जंगलात गेले होते.

डोंगरगाव वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक १०३२मध्ये तेंदूपत्ता तोडत असताना त्यांच्यावर अचानक अस्वलाने हल्ला केला. यावेळी तिघांनी आरडाओरडा केल्यानंतर जवळील मजूर धावून आल्याने अस्वलाने तिथून पळ काढला. यावेळी इतर मजुरांनी अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मजुरांना केशाेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. तेथे या मजुरांवर उपचार सुरू असून, या घटनेची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.

टॅग्स :Accidentअपघातwildlifeवन्यजीवgondiya-acगोंदिया