शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडक्या बहिणींना वर्षाला देणार २५००० ; अजित पवारांची घोषणा, जाहीरनाम्यात काय काय?
2
"सत्ता गेली, तर कुत्र पण विचारणार नाही", मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून जयंत पाटलांनी फटकारलं
3
डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या ग्रामीण भागात 'सुपरहिट'; कमला हॅरिस यांचे प्रयत्न कमी पडल्याची चिन्हे
4
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; तुमच्याकडे कारचं ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर...
5
रुपाली भोसलेने Bigg Boss मधील 'या' स्पर्धकाची केली कानउघाडणी; म्हणाली, "का हा ॲटिट्युड?"
6
कंगना रणौतचा डोनाल्ड ट्रम्प यांना सपोर्ट, म्हणाली- "मी अमेरिकन असती तर..."
7
Sunita Williams : सुनीता विलियम्स यांच्यासह नासाच्या ३ अंतराळवीरांनी केलं मतदान; स्पेसमधून कसं दिलं जातं मत?
8
"आम्ही मुंब्राच काय, पाकिस्तानात शिवरायांचं मंदिर उभारू", संजय राऊतांचे देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर
9
सांगोल्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीत फूट; ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा की शेकापला साथ?
10
त्या घटनेच्या प्रतीला 'लाल' कव्हर, राहुल गांधींना अर्बन नक्षल्यांनी घेरलंय; फडणवीसांचा थेट हल्ला
11
IPL मेगा लिलावात उतरलाय कोच; त्याच्यावर बोली लावत CSK 'सुपर कॉम्बो'चा डाव साधणार? की...
12
Tulsi Vivah 2024 यंदा तुळशीचे लग्न कधी? ‘अशी’ सुरु झाली परंपरा; पाहा, मान्यता अन् महत्त्व
13
Bank Locker Charges : 'या' सरकारी बँकांनी वाढवले बँक लॉकर चार्जेस; आता किती द्यावे लागतील पैसे; तुमचा लॉकर आहे का?
14
मराठमोळी अभिनेत्री दीप्ती देवीचं घटस्फोटावर पहिल्यांदाच भाष्य; म्हणाली, "आजही माझं त्यांच्यावर..."
15
"ना शिवरायांनी सांगितलं, ना बाबासाहेबांनी सांगितलं, हे आत्ता सुरू झालं, कारण..."; 'संत' म्हणत राज यांचा पवारांवर हल्लाबोल
16
"माझा राजकीय अस्त करण्याची व्यूहरचना"; पंकजा मुंडेंच्या पराभवाचा उल्लेख, धनंजय मुंडे काय बोलले?
17
मंगलदेशा, पवित्रदेशा, नातेवाइकांच्याही देशा..., कुटुंबकबिल्याच्या विळख्यात महाराष्ट्राचं राजकारण
18
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
19
वृश्चिक संक्रांती: ७ राशींना लाभच लाभ, सरकारी नोकरीचे योग; उत्पन्नात वाढ, पैशांची बचत शक्य!
20
“लोकांची भावना तुतारीकडे…”; भाजपच्या सुरेश धस यांचं वक्तव्य: अजित पवारांवर साधला निशाणा!

नऊ देशातील पाहुण्यांचा तीन महिने गोंदियात मुक्काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2019 10:25 PM

जिकडे-तिकडे तलावांची संख्या कमी होत चालल्याने पक्ष्यांचे खाद्य कमी होत आहे. परिणामी तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया व भंडारा जिल्ह्यात नऊ देशातील विदेशी पाहुणे (पक्ष्यांचा) तब्बल तीन महिने मुक्काम असतो. यंदाही या पक्ष्यांचे आगमन मोठ्या प्रमाणात झाले असले तरी दरवर्षी या पक्ष्यांची संख्या रोडावत चालली असल्याचे पक्षीप्रेमींनी सांगितले.

ठळक मुद्देआवडत्या अन्नाचा शोध : तलावांचा जिल्हा आवडतोय स्थलांतरीत पक्ष्यांना

नरेश रहिले ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिकडे-तिकडे तलावांची संख्या कमी होत चालल्याने पक्ष्यांचे खाद्य कमी होत आहे. परिणामी तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया व भंडारा जिल्ह्यात नऊ देशातील विदेशी पाहुणे (पक्ष्यांचा) तब्बल तीन महिने मुक्काम असतो. यंदाही या पक्ष्यांचे आगमन मोठ्या प्रमाणात झाले असले तरी दरवर्षी या पक्ष्यांची संख्या रोडावत चालली असल्याचे पक्षीप्रेमींनी सांगितले.गोंदिया जिल्ह्यात सायबेरीया, मंगोलीया, पाकीस्तान, लद्दाख, श्रीलंका, नेपाळ, बलुचिस्तान, स्कॉटलँड, बांग्लादेश आदी देशातून बारहेडेड गुल, ग्रेलेगगुज, ब्राम्हणी सेलडक, कॉमन सेलडक, कोंबडॅक, कॉटनटेल, गडवाल, मालार्ड, स्पॉटबिलडक, नॉर्दन शॉव्हलर, नॉर्दन पिंटेल, गार्गेनी, कॉमन टेल, रेडक्रेस्टेड पोचार्ड, कॉमन पोचार्ड, ग्रेहेडेड लॅपविन इत्यादी पक्षी येतात. जिल्हा पक्ष्यांच्या संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे. जिल्ह्यात तलावांची संख्या मोठ्या प्रमाणात असून या तलावांमध्ये पक्ष्यांना आवडते खाद्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. त्यामुळे डिसेंबर ते फेब्रुवारी महिन्यापर्यंत असा तीन महिने मुक्काम विदेशी पक्ष्यांचा गोंदिया जिल्ह्यात असतो. बऱ्याच तलावांमध्ये अतिक्रमण झाले आहे. तसेच त्या तलावातील गाळ काढण्याच्या नावावर पक्ष्यांचे खाद्य संपविण्यात येत आहे. त्यामुळे विदेशी पक्ष्यांची संख्या दरवर्षी कमी होत आहे. मात्र यानंतरही इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गोंदिया जिल्ह्यातील मोजक्या तलावांची स्थिती बरी असल्यामुळे त्या तलावांकडे स्थलांतरीत पक्ष्यांचे आगमन नेहमीच होत असते. जिल्ह्यात हजारो तलाव आहेत. परंतु फक्त पाचच तलावांवर पक्ष्यांचा महाकुंभ दिसून येतो. उर्वरीत तलावांवर पक्षी भटकत नाहीत. याचाच अर्थ जिल्ह्यातील इतर तलावांची स्थिती पक्ष्यांसाठी अनुकूल नाही.पक्ष्यांची संख्या वाढविण्यासाठी हे करापक्ष्यांचे आवडते खाद्य तलावाच्या काठावर पावसाळ्यात लावावे, ज्या ठिकाणी पक्ष्यांचा अधिवास आहे त्या ठिकाणी शक्यतो जाणे टाळावे, त्या पक्ष्यांचे निरीक्षणासाठी जातांनाही दूरूनच निरीक्षण करावे, पक्षी विचलीत होणार नाही याची काळजी घ्यावी,शेकºयांनी पावसाळा संपतांना तलावातील पाणी शेतात नेण्यासाठी पाळ फोडतात ते फोडू नये, तलावातील सदासावली, काटेकोळसा हे पक्ष्यांना त्रास देणाºया वनस्पती नष्ट करावेत.शिकाऱ्यांना पायबंद घालण्यासाठी गस्त वाढवातलावांवर येणाऱ्या देशी, विदेशी पक्ष्यांची फासे लावून, विष टाकून शिकार केली जाते. ती शिकार होऊ नये यासाठी वनविभाग व वन्यप्रेमींनी गस्त घालण्याचे प्रमाण वाढविण्याची गरज आहे. त्यामुळे तलावांवर होणारी शिकार थांबेल. ही शिकार थांबविण्यासाठी स्थानिकांची मदत घ्यावी.दिवसेंदिवस पक्ष्यांची संख्या कमी-कमी होणे ही धोक्याची घंटा आहे. यासाठी फक्त वन्यजीव व वनविभागावर अवलंबून न राहता गावातील पक्षीप्रेमींनी आपले कर्तव्य समजून त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करावा. पक्ष्यांचे अन्न व अधिवास टिकविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न होणे आवश्यक आहे.- मुकूंद धुर्वे, मानद वन्यजीवरक्षक तथासंवर्धन अधिकारी सातपुडा फांऊडेशन गोंदिया.