शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

मातंग समाजातील विद्यार्थ्यांसाठी तीन महिन्यांचे मोफत प्रशिक्षण; अर्ज केला का?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 4:12 PM

Gondia : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळातर्फे मोफत व्यावसायिक प्रशिक्षण

गोंदिया : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळातर्फे मातंग समाजातील विद्यार्थ्यांसाठी तीन महिन्यांचे मोफत व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्याकरिता विविध प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांनी मंडळाकडे प्रस्ताव पाठविलेले आहे. विद्यार्थ्यांना मंडळाच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जाणार आहे. कौशल्य प्रशिक्षणातून मुले-मुली स्वतः व्यवसायातून उद्योगही उभारणी करू शकणार आहे. त्यासाठी उद्दिष्ट देण्यात आले आहे.

तीन महिन्यांचे मोफत व्यावसायिक प्रशिक्षण रोजगारासाठी स्किल डेव्हलपमेंट असलेली फळी उभी करण्याकरिता शासनाने इलेक्ट्रिशन, वेल्डर, कार चालक तसेच विविध प्रकारचे प्रशिक्षण समाजातील विद्यार्थ्यांना देण्यासाठी योजना आणलेली आहे.

अर्ज कोठे कराल?अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालयात विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आवडत्या प्रशिक्षणासाठी अर्ज करणे अनिवार्य आहे. त्यांची निवड करून प्रशिक्षण संस्थेकडे त्यांना पाठविण्यात येईल.

अर्ज कसा कराल? ठरवून दिलेल्या रोजगाराविषयी स्किल डेव्हलपमेंटचे प्रशिक्षण घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून अर्ज करावा.

कागदपत्रे कोणती आवश्यक? तुम्ही शिक्षण घेतलेल्या मूळ कागदपत्रांसह अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाच्या पोर्टलवर स्किल डेव्हलपमेंटसाठी अर्ज करायचा आहे.

कोणते प्रशिक्षण मिळणार? ■ स्वतः कोणता व्यवसाय निवडायचा वेल्डर, फिटर, वाहनचालक, तसेच विविध स्किल डेव्हलपमेंटचे विषय त्यात देण्यात आलेले आहेत. ■ आपल्याला आवश्यक असलेल्या प्रशिक्षणासाठी आपण अर्ज करायचा आहे. तीन महिने प्रशिक्षण दिल्यानंतर त्याला प्रमाणपत्र मिळणार आहे.

टॅग्स :gondiya-acगोंदिया