नरेश रहिले।ऑनलाईन लोकमतगोंदिया : ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी केंद्र शासनाने राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन प्रमाणपत्र (एनक्यूएस) देण्याचे ठरविले. त्यासाठी चमूने निरीक्षण करून अटी व शर्तीमध्ये खऱ्या उतरणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रांना अतिरिक्त निधी देण्याची तयार शासनाने दर्शविली आहे. विदर्भातून निवड करण्यात आलेले तीन ही प्राथमिक आरोग्य केंद्र गोंदिया जिल्ह्यातील आहे.ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्याच्या सेवा देण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी, अधिकाºयांनी तत्परता दाखवावी, रूग्णांना उत्तम सेवा प्रदान करावी, याच हेतूने राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन प्रमाणपत्र (एनक्यूएस) देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.प्राथमिक आरोग्य केंद्रातील सेवेचा उत्तम दर्जा आहे किंवा नाही हे तपासून तो अहवाल शासनाला पाठविण्याचे निर्देश दिले आहे. राज्यातील सर्वच आरोग्य केंद्रात प्रसूती केली जाते.परंतु ज्या आरोग्य केंद्रात प्रसूतीचे प्रमाण उत्कृष्ट असेल, आरोग्य केंद्राची आंतर व बाह्य स्वच्छता चांगली असेल, त्या आरोग्य केंद्रातील रेकार्ड अद्यावत असेल, जैवीक कचऱ्याची विल्हेवाट योग्य पध्दतीने होत असेल अशा १०० नियमात खºया उतरणाऱ्या आरोग्य केंद्राची एनक्यूएसच्या चमूने तपासणी केली आहे. यात विदर्भातून केवळ तीन आरोग्य केंद्राची तपासणी करण्यात आली. ते तिन्ही आरोग्य केंद्र गोंदिया जिल्ह्यातील आहेत.पहिले प्राथमिक आरोग्य केंद्र आमगाव तालुक्याच्या ठाणा येथील, दुसरे गोरेगाव तालुक्याच्या चोपा येथील तर तिसरे गोंदिया तालुक्यातील दासगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आहे.एनक्यूएस प्रमाणपत्र घेण्यासाठी सज्ज असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील या तिन्ही प्राथमिक आरोग्य केंद्राची तपासणी एनक्यूएस चमूतील डॉ. विनोद वाघमारे व डॉ.प्रकाश साठे यांनी केली आहे.या तिन्ही प्राथमिक आरोग्य केंद्राला एनक्यूएस प्रमाणपत्र मिळण्याची दाट शक्यता आहे.तीन वर्षासाठी प्रत्येक पीएचसीला तीन-तीन लाखराष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन प्रमाणपत्र (एनक्यूएस) मिळणाऱ्या प्राथमिक आरोग्य केद्रांना तीन वर्षासाठी प्रत्येक पीएचसीला तीन-तीन लाख रूपयांचा अतिरिक्त निधी रूग्णाच्या सेवेसाठी मिळणार आहे. त्या रकमेतून रूग्णांच्या सेवेत भर पडणार आहे. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राने आंतरराष्ट्रीय स्तरावरील सेवा द्याव्यात असा मानस गोंदियाच्या आरोग्य विभागाचा आहे.एक तृतीयांश पीएचसी होणार ‘एनक्यूएस’गोंदिया जिल्ह्यात ४२ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. ह्या आरोग्य केंद्रापैकी एक तृतीयांश प्राथमिक आरोग्य केंद्र येत्या सहा महिन्यात आंतरराष्ट्रीय स्तरावरील सेवा देणारे प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणजेच एनक्यूएस संस्था होणार असल्याचा माणस जिल्हा आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे.आरोग्यासाठी लाभदायक ठरणाऱ्या सर्वबाबींची पूर्तता त्या प्राथमिक आरोग्य केंद्रांनी केल्यास तसेच सर्व रेकार्ड अद्यावत ठेवण्यात अपडेट असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांना एनक्यूएसचे प्रमाणपत्र देण्यात येते. यात जिल्ह्यातील तीन प्राथमिक आरोग्य केंद्राचा समावेश आहे.- डॉ.श्याम निमगडे, जिल्हा आरोग्य अधिकारी जि.प. गोंदिया.
तीन पीएचसीत मिळणार आंतरराष्ट्रीय दर्जाची सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 9:20 PM
ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी केंद्र शासनाने राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन प्रमाणपत्र (एनक्यूएस) देण्याचे ठरविले.
ठळक मुद्देएनक्यूएसच्या चमूने केले निरीक्षण : ग्रामीण भागाला होणार लाभ