शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

तीन तालुक्यात मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2017 12:12 AM

यंदा जून ते सप्टेबर दरम्यान पावसाची तुट, उपलब्ध असलेल्या भूजलाची कमतरता, दूरसंवेदनविषयक निकष, वनस्पती निर्देशांक, मृद आर्द्रता, पेरणीखालील क्षेत्र व पिकांची स्थिती या सर्व घटकांमुळे ...

ठळक मुद्देराज्य शासनाचा निर्णय : उपाययोजना राबविण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : यंदा जून ते सप्टेबर दरम्यान पावसाची तुट, उपलब्ध असलेल्या भूजलाची कमतरता, दूरसंवेदनविषयक निकष, वनस्पती निर्देशांक, मृद आर्द्रता, पेरणीखालील क्षेत्र व पिकांची स्थिती या सर्व घटकांमुळे सन २०१७ च्या खरीप हंगामात जिल्ह्यातील गोंदिया, तिरोडा व गोरेगाव हे तालुके प्रभावित झाले. त्यामुळे या तालुक्यात आपत्तीची शक्यता विचारात घेत राज्य शासनाने या तीन तालुक्यात मध्यम स्वरु पाचा दुष्काळ जाहीर केला आहे.जिल्ह्यातील गोंदिया, तिरोडा व गोरेगाव या तालुक्यात दुष्काळ जाहीर झाल्यामुळे या तालुक्यांना आठ प्रकारच्या सवलती लागू करण्यासाठी शासनाने मंजूरी दिली आहे. यामध्ये जमीन महसूलात सुट, सहकारी कर्जाचे पुनर्गठण, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीला स्थगिती, कृषीपंपाच्या चालू वीज देयकात ३३.५ टक्के सुट शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोहयोअंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर वापर आणि टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकºयांना शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे या सवलतींचा समावेश आहे. मात्र यातून उर्वरित पाच तालुक्यांना वगळण्यात आल्याने शेतकºयांमध्ये रोष व्याप्त आहे.उर्वरित पाच तालुक्यांचे कायराज्य सरकारने गोंदिया, तिरोडा, गोरेगाव तालुक्यात मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर केला. यासंबंधीचे आदेश गुरूवारी (दि.२) काढण्यात आले. मात्र यंदा जिल्ह्यात सर्वत्र दुष्काळी परिस्थिती असताना केवळ तीन तालुक्यात दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली. त्यामुळे शेतकºयांमध्ये नाराजीचा सूर आहे. उर्वरित पाच तालुक्यांचे काय असा सवाल उपस्थित केला जात आहे.शेतकºयांनी उपस्थित राहावेजिल्ह्यात धान पीक मोठ्या प्रमाणात घेण्यात येते. या पिकाकरीता १२०० मि.मी. पावसाची आवश्यकता असते. खरीप हंगाम २०१७ मध्ये सरासरीच्या केवळ ५३ टक्के पाऊस झाल्याने जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. खरीप हंगाम २०१७ मध्ये जिल्ह्यातील एकूण ५७ हजार १७५ शेतकºयांनी पीक विमा काढला आहे. पीक विमा योजनेचा लाभ मिळण्यासाठी महसूल मंडळ हा घटक ग्राह्य धरला जातो. प्रत्येक महसूल मंडळनिहाय उत्पादकतेची आकडेवारी निश्चित करण्याकरीता जिल्ह्यात ३०० पीक कापणी प्रयोग घेण्यात येणार आहे.पीक कापणी प्रयोगाकरिता समितीपीक कापणी प्रयोगाकरीता गावस्तरीय सर्व सदस्य, कृषी विस्तार अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच, पोलीस पाटील व कृषी सहायक यांचा समावेश आहे. पीक कापणी व मळणीच्यावेळी शेतकºयांनी उपस्थित राहून पीक कापणी प्रयोगामध्ये प्राप्त उत्पन्नाची नोंद घ्यावी. तसेच पीक कापणीचे मोबाईल अ‍ॅप्सवर क्षेत्रीय कर्मचारी माहिती भरतील याची दक्षता घ्यावी.