नरेश रहिले
गोंदिया: येथील जिल्हा सत्र न्यायालयातन्यायालयात न्यायालयीन कामकाजासाठी लावण्यात आलेल्या तीन महिला पोलीस शिपाई यांच्या कामकाजासंदर्भात न्यायाधीशांनी पाठविलेल्या अहवालावरून पोलीस अधिक्षक निखील पिंगळे यांनी तीन महिला पोलिसांना निलंबित केले आहे. ही निलंबनाची कारवाई २४ फेब्रुवारी रोजी करण्यात आली आहे.
निलंबित झालेल्या महिला पोलिस कर्मचाऱ्यांत भरोसा सेलमध्ये कार्यरत अश्वीनी फंदी, डुग्गीपार पोलीस ठाण्यातील अनिता हरिणखेडे व रामनगर पोलीस ठाण्यातील शिल्पा जांगळे यांचा समावेश आहे. त्या जिल्हासत्र न्यायालयात न्यायालयीन कामकाजासाठी असतांना त्यांनी आपल्या कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत न्यायाधीशांनी त्यांचा अहवाल पोलीस अधिक्षक निखील पिंगळे यांना पाठविला. या अहवालाच्या आधारे त्यांना २४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी निलंबित करण्यात आले आहे. या तिन्ही महिला पोलीसांची नियुक्ती जिल्हा न्यायालयात पोलीस विभागाच्या वतीने करण्यात आली होती. कर्तव्यात कसुर केल्याप्रकरणी निलबिंत करण्यात आले आहे.