गोंदिया: तुझ्या वडीलाची अनुकंपाची नोकरी तुझा कशाला पाहिले म्हणून वाद घालणाऱ्या काकेभावाने चुलत भावाला चाकूने मारून गंभीर जखमी केल्याची घटना १ जून २०२२ रोजी गोंदियाच्या दसखोली येथे घडली. या प्रकरणातील आरोपी मनिष ऊर्फ बूच्ची मन्नू कुलदीप याला मुख्य न्याय- दंडाधिकारी, न्यायालय गोंदिया यांनी तीन वर्षाचा सश्रम कारावास व एक हजार रूपये दंड ठोठावला. ही सुनावणी १९ जुलै रोजी करण्यात आली.
गोंदियाच्या दसखोली येथे १ जून २०२२ रोजी रुपेश राजेश कुलदीप (२२) याला आरोपी मनिष ऊर्फ बूच्ची मन्नू कुलदीप ह्या काकेभावाने रूपेशला त्याच्या वडीलाची नगरपरीषदमध्ये अनुकंपावर नोकरी मिळू नये म्हणून वाद केला. राजेश कुलदीप हे गोंदिया नगर परिषदेत सफाई कामगाराच्या पदावर कार्यरत होते. ते मरण पावल्याने वडीलाची ड्युटी मिळविण्याकरीता नगर परीषद गोंदिया येथे रूपेशने अर्ज दाखल केले होते. यावरुन आरोपीने त्याची नोकरी आपल्याला पाहिजे म्हणून रूपेश सोबत नेहमी भांडण करीत होता. लोखंडी चाकुने रूपेशच्या डाव्या जांगेवर मारुन गंभीर जखमी केले होते. गोंदिया शहर पोलिसात आरोपीवर भादंविच्या कलम ३२४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.
मुख्य न्यायदंडाधिकारी अभिजीत कुलकर्णी यांनी१९ जुलै रोजी आरोपीला ३ वर्षाचा सश्रम कारावास व एक हजार रूपये द्रव्य दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास अतिरिक्त एक महिना कारावास सुनावला आहे. शिक्षा झालेल्या गुन्हयाचा तपास पोलीस हवालदार आशिष गभने यांनी केला आहे. खटल्याचा युक्तीवाद सरकारी अभियोक्ता मुकेश बोरीकर यांनी केला आहे. न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस हवालदार ओमराज जामकाटे, पोलीस शिपाई किरसान यांनी काम पाहिले.