लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आॅनलाईन सर्विसेसच्या नावावर प्रवाशांना अवैधरित्या तिकीट तयार करून देणाऱ्या दुकानावर धाड घालून रेल्वे स्पेशल टास्क टिमने हा प्रकार उघडकीस आणला आहे. टिमने भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे गुरूवारी (दि.१३) आॅपरेशन थंडर च्या नावाने ही कारवाई केली. या कारवाईत पथकाने मोठ्या प्रमाणात तयार केलेल्या तिकीट व अन्य साहीत्य जप्त केले आहे.स्पेशल टास्क टिमचे उपनिरीक्षक विनेक मेश्राम, सहायक उपनिरीक्षक वाय.जी. रामटेके, मुख्य आरक्षक पी. दलाई, आर.सी. कटरे, आरक्षक बी. कोरचाम, एस.एस. बघेल, नाशीर खान, पी.एल. पटेल व विशेष गुप्त शाखेचे आरक्षक आर.सी. धुर्वे यांनी अवैध तिकीट विक्री करणाऱ्यांविरोधात धाड सत्र सुरू केले आहे. यांतर्गत टीमने साकोली येथील नक्षत्र आॅनलाईन सर्विसेस य दुकानावर गुरूवारी घाड घातली. यावेळी दुकान मालक नरेंद्र सुदाम वाडीभस्मे (४१) उपस्थित होते. टिमच्या सदस्यांनी त्यांना विचारपूस केल्यावर त्यांनी अवैध तिकीट विक्रीला विरोध दर्शविला. परंतु त्यांच्या संगणकांची तपासणी केल्यावर त्यांच्याजवळ व्यक्तीगत व २० बोगस आयडी मिळाल्या. तीन-चार तास केलेल्या चौकशीनंतर अखेर वाडीभस्मे यांनी अधिक लाभ कमविण्यासाठी दलालांच्या माध्यमातून तिकीट विक्री केल्याची कबुली दिली.या कारवाईत टिमने एक लाख ७१ हजार ६२४ रूपयांच्या ८१ ई-तत्काल तिकीट, संगणक संच, प्रींटर, बीएसएनएल कंपनी चा ब्रॉडबँड, एक मोबाइल व एक हजार ५२० रूपये रोख जप्त केले. वाडीभस्मे यांना अटक करण्यात आली. असून रेल्वे अधिनियमाच्या कलम १४३ (१) (ए) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तिकीट विक्री करणाऱ्या आॅनलाईन सेंटरवर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 9:55 PM
आॅनलाईन सर्विसेसच्या नावावर प्रवाशांना अवैधरित्या तिकीट तयार करून देणाऱ्या दुकानावर धाड घालून रेल्वे स्पेशल टास्क टिमने हा प्रकार उघडकीस आणला आहे. टिमने भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे गुरूवारी (दि.१३) आॅपरेशन थंडर च्या नावाने ही कारवाई केली.
ठळक मुद्देरेल्वे स्पेशल टास्क टीमची कारवाई