शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे कुणाचं तरी षडयंत्र', सिद्धिविनायक प्रसादात उंदीर आढळल्याचे आरोप सदा सरवणकरांनी फेटाळले
2
अक्षय शिंदेला गोळी झाडणारा पोलीस निरीक्षक कोण? का झालं होतं मुंबई पोलिसातून निलंबन?; जाणून घ्या... 
3
सासूच्या बहिणीला केलं यकृत दान, त्यानंतर घडलं असं काही..., अर्चनाच्या मृत्यूने सारेच हळहळले
4
भाजपा एका आकड्यावर ठाम, 'फॉर्म्युला'ही जवळपास निश्चित! शिंदे-अजितदादांना किती जागा मिळणार?
5
शरद पवार, उद्धव ठाकरे ओबीसींसोबत नाहीत हे स्पष्ट झालं; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
6
खळबळजनक! विहिरीत सापडले पती-पत्नीचे मृतदेह; ३ महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न
7
सुनिल गावसकरांना दिलेली करोडोंची जमीन काढून अजिंक्य रहाणेला दिली; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय
8
Akshay Shinde Shot Dead : "मनोज जरांगे पाटील यांच्यावरुन लक्ष विचलित करण्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काउंटर"; राऊतांचा गंभीर आरोप
9
"माझ्या पत्नीचे अशरफशी संबंध, त्यानेच...": बंगळुरू हत्याकांडातील महालक्ष्मीच्या पतीचा मोठा दावा
10
दिवसाची कमाई ४५ लाख; कोण आहेत अरविंद कृष्णा? IIT च्या स्कॉलरनं कमावलं मोठं नाव
11
Pushpa 2 : फक्त ७५ दिवस आणखी... नवीन पोस्टरमध्ये दिसली 'पुष्पाराज'ची झलक
12
नकळतच सारे घडलं; "मला माफ करा!" १२ वर्षांपूर्वीच्या फोटोमुळं अशी फसली इंग्लंडची कॅप्टन
13
Video - २ लाख देऊन IPS झालेल्या मिथिलेशचं नवं स्वप्न; आता व्हायचंय डॉक्टर, 'हे' आहे कारण
14
जबरदस्त! अनलिमिटेड कॉलिंगसह डेटा मिळणार; BSNL'चा 'हा' स्वस्त रिचार्ज प्लॅन ५२ चालणार
15
अक्षय शिंदे एन्काउंटर : ज्या बदलापूर रेल्वे स्थानकावर आंदोलन तिथेच आनंद साजरा
16
Pitru Paksha 2024: गजलक्ष्मी व्रताला द्या स्तोत्राची जोड; सुख, वैभवाशी करावी लागणार नाही तडजोड!
17
बदला पूर्ण झाला...पीडितेला न्याय मिळाला; बदलापूर प्रकरणावर अमित ठाकरेंनी मांडली रोखठोक भूमिका!
18
Northern Arc Capital IPO Listing: दमदार लिस्टिंगनं पैशांचा पाऊस, प्रत्येक शेअरवर किती झाला गुंतवणूकदारांना फायदा?
19
Exclusive: "शो ७० दिवसातच संपणार म्हणूनच मला...", Bigg Bossच्या ट्विस्टवर अरबाजची प्रतिक्रिया
20
तिरुपती मंदिरात ४ तास हवन, सर्वकाही शुद्ध-पवित्र; नेमके कोणते विधी केले? पाहा, महत्त्व

व्याघ्र प्रकल्पातील प्रवेश गुप्तधन की शिकारीसाठी ?

By admin | Published: September 24, 2016 1:44 AM

अलिकडे वाघाच्या शिकारीचे प्रमाण वाढले आहे. व्याघ्र प्रकल्पात प्रवेश करताना परवानगीची आवश्यकता असते.

अर्जुनी-मोरगाव : अलिकडे वाघाच्या शिकारीचे प्रमाण वाढले आहे. व्याघ्र प्रकल्पात प्रवेश करताना परवानगीची आवश्यकता असते. व्याघ्र प्रकल्प निर्मितीनंतर जंगलात प्रवेश करणे हा संवेदनशील मुद्दा झाला आहे. अशातच विनापरवानगीने शस्त्रांसह व्याघ्र प्रकल्पाच्या संवेदनशील क्षेत्रात काही लोक आढळून आल्याने वन्यप्राण्याची शिकार करण्याचा उद्देशाने हा प्रवेश तर नव्हता ना? यादृष्टीने वनविभागातर्फे तपास सुरू आहे.या प्रकरणात मध्यप्रदेशच्या हौशंगाबाद येथील किसनलाल प्रभाकर टेंभरे हा खरा सूत्रधार आहे. शालीकराम गजबे यांच्याशी या कथित किसनलाल बाबाचे जुने संबंध होते. बाबा नेहमी इकडे-तिकडे या पद्धतीची कामे करीत होता. तो पिंडकेपार (साकोली) परिसरात आला असताना सर्वप्रथम या आरोपीपैकी त्याची ओळख करण शालीराम गजबे यांच्याशी ओळख झाली. आरोपीपैकी ४ ते ५ इसम हे मटक्याचे शौकीन आहेत. ते एक दिवस बाबाकडे गेले. त्यांनी बाबांचे काही चमत्कार ऐकले होते. त्यामुळे बाबा चमत्कारीक आहेत अशी त्यांची समजूत होती. येलोडीच्या जंगलात काहीतरी आहे असे बाबांनी सांगितले. यासाठी पायाळू व्यक्ती लागतो अशी बतावनी करण्यात आली. त्यानंतर हा मोठा प्लॉन तयार करण्यात आला. यात परिसरातीलाच ५ ते ६ लोक जुळली. मनोजकुमार घोरमारे हा नागपुरवरुन आला. यासाठी २० सप्टेंबरचा मूहूर्त ठरला. बाबा, करण व इतर लोकं नवेगावबांधला आली व नंतर घटनास्थळी पोहोचले. खड्ड्याचे खोदकाम करीत असताना वनकर्मचाऱ्यांनी छापा घातला. खड्डा खोदून पैसे शोधले असे आरोपी सांगू लागले.वनकर्मचाऱ्यांनी आजूबाजूचा परिसर पिंजून काढला. व्याघ्र प्रकल्पाचा संवेदनशील क्षेत्र असल्याने वाघाच्या शिकारीसाठी तर एकत्र आले नाहीत ना? या दृष्टीने वनविभागाचा तपास सुरु आहे. व्याघ्र प्रकल्प निर्मितीनंतर हे क्षेत्र अधिक संवेदनशील झाले आहे. मात्र ग्रामीण जनता पुर्वीॅसारखीच जंगलात वावरतात. वाघ अदूश्यतेचे प्रमाण वाढल्यानंतर वनविभाग अधिक सजग झाले आहे. ग्रामीणांनी व्याघ्र प्रकल्पाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करने गरजेचे आहे. (तालुका प्रतिनिधी)