ट्रांझिट लाईन : वनस्पतींचेही केले जाईल अध्ययन गोंदिया : नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पांतर्गत २३ ते २८ जानेवारीदरम्यान ट्रांझिट लाईन पद्धतीने वन्यप्राण्यांची गणना करण्यात येणार आहे. ही प्राणी गणना केवळ नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्पात होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.नागझिरा, न्यू नागझिरा, नवेगाव सेंचुरी, कोका हे अभयारण्य व नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान मिळून नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची घोषणा करण्यात आली होती. घोषित व्याघ्र प्रकल्पाच्या अंतर्गत दरवर्षी वन्यप्राण्यांची गणना केली जाते. यावर्षी २३ ते २८ जानेवारीदरम्यान वन्यप्राण्यांची गणना करण्यात येणार आहे. यासाठी दोन किलोमीटरची ट्रांझिट लाईन तयार केली जात आहे. सहा दिवसपर्यंत हे अभियान चालविण्यात येणार असून त्यापूर्वी सर्व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. गणनेच्या दरम्यान वनांचे प्रकार, भू प्रदेशाचा प्रकार व वन्यप्राण्यांच्या अधिवासाबाबत अध्ययन केले जात आहे. वन व मिश्रित वनांसाठी वेगवेगळ्या लाईन घालण्यात येत आहेत. वन क्षेत्रात राहणाऱ्या प्राण्यांचे पंजे, केलेली शिकार, मांसाहारी प्राण्यांच्या पायांची चिन्हे उचचले जातील. याशिवाय शाकाहारी प्राण्यांचे पंजे व मलमूत्रासंबंधी माहिती घेतली जाईल. या गणनेच्या दरम्यान वनस्पती-वृक्षांचे अध्ययन केले जाईल. संरक्षित क्षेत्राची ट्रांझिट वेगळ्या प्रकाराने एकत्रित करण्यात आली. (प्रतिनिधी)
व्याघ्र प्रकल्पात होणार प्राणिगणना
By admin | Published: January 21, 2016 1:36 AM