वाताहत शिक्षणाचीविजय मानकर सालेकसासालेकसा तालुक्यातील शिक्षकांना लागलेल्या ‘अप-डाऊन’च्या ग्रहणासोबतच शिक्षकांपासून ते थेट अधिकाऱ्यांपर्यंत सेवा भावनेला बाजुला ठेवून वेळकाढूपणा, कमिशन सिस्टममुळे शिक्षणाचा बट्ट्याबोळ झाला आहे. प्रत्येक कामात गुणवत्ता घसरलेली असून विद्यार्थ्यांना मिळणारी भौतिक सुविधाही ढासळली आहे. त्यातच राजकीय मंडळींचा स्वार्थ व संधीसाधुपणाने शिक्षणाची वाताहात होत आहे. तालुक्यातील नक्षलग्रस्त भागात तर अनेक शाळा शेवटच्या घटका मोजत आहेत.सालेकसा तालुक्यात एकुण १५० शाळा असून यात १७ हजार ६९४ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यात प्राथमिक शाळांची संख्या ७६ असून त्यात १८०६ विद्यार्थी आहेत. उच्च प्राथमिक ५३ शाळांमध्ये ८०४९ विद्यार्थी शिकत आहेत. २३ माध्यमिक शाळांपैकी दोन जिल्हा परिषदेच्या आणि तीन आश्रमशाळा आहेत. एकंदरीत २३ शाळांमध्ये ७ हजार ८३९ विद्यार्थी शिकत आहेत. इयत्ता १ ते ४ च्या प्राथमिक शाळांमध्ये ७४ पैकी तब्बल ७३ शाळा दोन शिक्षकी आहेत. एका शिक्षकामागे सरासरी १२ तर एका शाळेत सरासरी २४ विद्यार्थी शिकत आहेत. तरीसुद्धा काही शाळांमध्ये फक्त बोटावर मोजण्याइतकीच पटसंख्या आहे. सदर प्रतिनिधीने काही शाळांना भेट दिली असता काही ठिकाणी अतिशय दयनीय अवस्था दिसून आली. अनेक वर्गखोल्यांचे छत पावसाच्या पाण्याने गळत आहे. ते छत केव्हाही कोसळू शकते, अशी परिस्थिती आहे. जास्तीत जास्त शाळांमध्ये वर्गखोल्यांच्या तळाशी ओल आल्याने विद्यार्थ्यांना चटई टाकून बसणे सुद्धा गैरसोयीचे होत आहे. वर्गखोल्या बसण्यायोग्य नसल्याने एका शाळेत तर विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर मैदानावर बसविण्यात आल्याचे दृष्य पहायला मिळाले. यादरम्यान पाऊस आला तर पुन्हा ओल आलेल्या वर्गात बसविले जात असल्याचे कळले. काही शाळांमध्ये कौलारू इमारतीमध्ये मातीच्या फरशीवर विद्यार्थ्याना बसावे लागते. इमारतीच्या दारालगत गवत वाढले आहे. अशात साप विंचू यासारखे विषारी प्राणी वर्गात प्रवेश करण्याची भिती नेहमी असते. शाळेचे शिक्षक रोज कोणती न कोणती माहिती तयार करताना दिसतात. केंद्र प्रमुख विस्तार अधिकारी माहिती संकलन करण्यासाठी न जाता मुख्याध्यापकांना रेकार्ड बोलवून घेतात असेही काही केंद्रात चालत आहे.माहिती भरण्यातच जातो वेळशाळा चालविण्यापासून शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी शासनाने केलेली व्यवस्था येथे कुचकामी ठरत आहे. तालुकास्तरावरील अधिकाऱ्यांना शाळांची माहिती संकलित करणारे पत्र आले तर त्या पत्रांवर संदर्भ लिहून विस्तार अधिकाऱ्यांचा पत्र सोपविले जातात. ते पत्र नंतर केंद्र प्रमुखांना दिले जातात. केंद्र प्रमुख मुख्याध्यापकांना देतात आणि मुख्याध्यापक आपल्या खुर्चीची शोभा वाढवित आपल्या सहाय्यक शिक्षकाला माहितीचे प्रपत्र तयार करण्याचे आदेश देतात. शिक्षक वर्गात अध्यापन कार्य थांबवून माहिती तयार करण्यात आपला वेळ घालवतात आणि विद्यार्थ्यांचे शिक्षण वाऱ्यावर अशी अवस्था बहुतांश शाळांमध्ये दिसून येते. अप-डाऊनचे ग्रहण सुटेनासालेकसा तालुक्यात कर्मचारी अधिकाऱ्यांना अपडाऊन करण्याची सवय लागली आहे. शिक्षक व शिक्षणाशी संबंधित अधिकारीसुद्धा दररोज येणे-जाणे करीत असतात. अनेकांचा वेळ आॅफीसमध्ये जातो किंवा रेल्वेच्या वेळापत्रकानुसार ते शाळेत पोहोचतात व जातात. त्यामुळे अनेकांचे मन शिक्षण कार्याकडे कमी व येण्याजाण्याकडे जास्त असते. मागील काही वर्षात काही प्रमाणात स्थानिक शिक्षक तालुक्यात वास्तव्यात असल्याने आपल्या सोयीनुसार शाळेत पोहोचतात. परंतु मोठ्या प्रमाणावर अधिकारी कर्मचारी व शिक्षक अपडाऊन करीत असल्याने या तालुक्यात अपडाऊनचे ग्रहण सुटताना दिसत नाही. ६७ टक्के शाळांचे विद्यार्थी संगणकापासून वंचिततालुक्यात एकुण १५० शाळांपैकी फक्त ५० शाळांमध्ये संगणक शिक्षणाची सोय आहे. परंतु काही मोजक्या शाळांमध्ये संगणक शिकविले जातात. ५० पैकी २३ माध्यमिक शाळांमध्ये संगणक शिक्षक आहेत, तर २७ शाळा वरिष्ठ प्राथमिक असून त्यातील बहुतांश शाळांमध्ये संगणक धूळ खात पडले आहेत. १०० शाळांतील विद्यार्थ्यांनी संगणक पाहिला नाही. सर्व घटकांनी गांभीर्याने विचार करून शिक्षण व्यवस्था दुरूस्त करण्याची गरज आहे. राजकारणातून कारवाई नाहीराजकारणी लोक आपल्या सोयीनुसार कारवाईसाठी दखल देत असतात. त्यामुळे दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई कधीच होताना दिसत नाही. चुक केली तरी आपली समन्वय साधुन राजकीय प्रभाव टाकुन प्रकरणावर पांघरून घालण्याचा प्रयत्न होत असतो. त्यामुळे शिस्तीचे पालन करीत शिक्षक कार्य करताना दिसत नाही. शाळा व्यवस्थापन समित्यासुद्धा अधिकारांचा उपयोग करताना दिसत नाही. त्यामुळे तालुक्याची शिक्षण व्यवस्था वाऱ्यावर दिसत आहे.
वेळकाढूपणाने शिक्षणाचा बट्टयाबोळ
By admin | Published: August 01, 2015 2:08 AM