लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : यंदा कमी प्रमाणात बरसलेल्या पावसामुळे सध्या शेतकरी अडचणीत असतानाच येणाºया काळात सर्वांनाच याचा फटका सहन करावा लागणार आहे. कारण कमी पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांत अत्यल्प पाणीसाठा आहे. आजची ही स्थिती असताना यावरून येणाºया काही महिन्यांच्या स्थितीचा अंदाज बांधता येतो.पाहिजे त्या प्रमाणात पाऊस आता बरसत नाही. त्यातही यंदा तर जिल्ह्यात मागील वर्षीच्या तुलनेत कित्येक पटीने कमी पाऊस बरसला. परिणामी जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाअभावी शेतातील पीक हातून जाण्याची चिन्हे दिसून येत आहेत. डोळ््यासमोर पीक मरत असल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. सध्या तरी कमी पावसाचा फटका फक्त शेतकºयांच्या चेहºयावरच दिसून येत असून सर्वसामान्य जनतेला याचा काहीच भान नाही. मात्र काही महिन्यांनी कमी पावसाचे दुष्परिणाम त्यांनाही भासणार यात शंका नाही.जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारे प्रकल्प यंदा कमी पावसामुळे तहानलेलेच आहेत. या प्रकल्पांत अपेक्षेपेक्षा कित्येक पटीने कमी पाणीसाठा आजच्या स्थितीत आहे. किंवा नाममात्र पाणीसाठा असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नसून पावसा अभावी या प्रकल्पांची तहान भागलेली नाही. पावसाळ््यात या प्रकल्पांची ही स्थिती असताना काही महिन्यांनी प्रकल्पांत पाणी राहणार नाही तेव्हा मात्र काय होणार याची आताच कल्पना करता येईल. यामुळेच येणारा काळ कठीण जाणार असल्याची चिन्हे आतापासून दिसून येत आहेत.शहरात दमदार पावसाची हजेरीपावसाळ््यात पाऊस जसा बरसायला हवा तसा काही बरसला नाही. आता मात्र परतीच्या वेळी पाऊस आपली हजेरी लावत आहे. सोमवारी (दि.११) शहरात सायंकाळी ४ वाजतापासून दमदार पावसाने हजेरी लावली.सुमारे अर्धा तास बरसलेल्या या पावसाने वातावरण गार झालेच शिवाय सर्वांनाच सुखावून सोडले. अशाच प्रकारे दररोज पाऊस बरसत राहील्यास काही प्रमाणात भरपाई होणार.यंदाच्या हंगामातील रबी कठीणचजिल्ह्यातील बहुतांश शेतकरी आजही वरथेंबी पावसावरच आपली शेती करीत आहेत. यामुळे रबीचा हंगाम पाटबंधारे विभागाकडून देण्यात येणाºया पावसावरच अवलंबून असतो. अशात आता प्रकल्पांत पाणी नसताना रबीसाठी पाणी सोडणे कठीण आहे. यावरून आजच रबीचा हंगाम यंदा कठीणच असल्याचे स्पष्ट होते. प्रकल्पांतील पाण्याच्या भरवशावरच जिल्ह्याचा संपूर्ण खेळ चालतो. आता जिल्ह्यातील हे प्रकल्पच आॅक्सीजनवर असताना त्यांच्याकडून अपेक्षा करणे चूकीचे ठरणार आहे. ही स्थिती जिल्ह्यातील प्रकल्पांचीच नसून लगतच्या मध्य प्रदेश राज्यातील व शेजारच्या भंडारा जिल्ह्यातील प्रकल्पांचीही आहे.
येणारा काळ कठीण जाणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 10:25 PM
यंदा कमी प्रमाणात बरसलेल्या पावसामुळे सध्या शेतकरी अडचणीत असतानाच येणाºया काळात सर्वांनाच याचा फटका सहन करावा लागणार आहे.
ठळक मुद्देअत्यल्प पाणीसाठा :जिल्ह्यातील प्रकल्प तहानलेलेच