शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
5
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
6
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
7
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
8
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
9
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
10
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
11
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
13
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
14
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
16
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
18
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
19
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
20
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल

तंबाखूविरोधी कार्यक्र म राबवा

By admin | Published: August 01, 2016 12:05 AM

तंबाखुमुळे शरिरावर दुष्परिणाम होतात. सोबतच कर्करोग होण्याची शक्यताही असते.

गोंदिया : तंबाखुमुळे शरिरावर दुष्परिणाम होतात. सोबतच कर्करोग होण्याची शक्यताही असते. शाळा परिसरातील दुकाने, पानटपरी, हॉटेल्समधून तंबाखूची विक्री होणार नाही याकडे विशेष लक्ष दयावे. विद्यार्थी आणि लोकांमध्ये तंबाखूच्या दुष्परिणामांची जाणीव करण्यासाठी तंबाखुविरोधी कार्यक्र म राबवावे असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी दिले. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कायद्याअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित सभेत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. सभेला समितीचे सदस्य जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भुजबळ, सदस्य सचिव जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.देवेंद्र पातुरकर, सदस्य अन्न सुरक्षा अधिकारी ए.डी.राऊत, विक्रीकर उपायुक्त शिला मेश्राम, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, नगर परिषद मुख्याधिकारी चंदन पाटील, उपशिक्षणाधिकारी राजन घरडे, आरोग्य विभागाचे डॉ.पटले, डॉ.एन.एन.येडे, डॉ.मनीष बत्रा, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रा.बबन मेश्राम, आकृती थिंक टूडेचे प्रमोद गुडथे उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ. सुयर्वंशी यांनी, गुडाखू व चैनीखैनीच्या उत्पादक कंपन्यांवर अन्न औषध प्रशासनाने धाड मारावी. तसेच या विभागाने दररोज दहा ठिकाणी धाडी मारु न संबंधित वस्तुंची तपासणी करावी. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना तंबाखू विरोधी कार्यक्र मात सहभाग करून घ्यावे असे सांगीतले. तसेच जिल्ह्यातील पहिली ते सातवीपर्यंत वर्ग असलेल्या शाळांमधून तंबाखूविरोधी कार्यक्रम राबवावे. विद्यार्थ्यांच्या घरी कोण तंबाखू, बिडी, सिगारेट, गुडाखू खातात याची माहिती संकलीत करावी. शिक्षक व मुख्याध्यापकांनी सुद्धा शाळांमध्ये तंबाखू खाणे व धुम्रपानावर बंदी घालावी तसेच तंबाखूमुक्त शाळा ही संकल्पना जिल्ह्यात राबवावी असेही जिल्हाधिकारी डॉ. सुर्यवंशी यांनी सांगीतले. (शहर प्रतिनिधी)