शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! नागपूर जिल्ह्यात कुटुंबाची सामूहिक आत्महत्या; पती-पत्नीसह दोन मुलांनी घेतला गळफास
2
"रोहित पवार, रोहित पाटील, टोपेंसह ५० उमेदवारांना पाडणार", लक्ष्मण हाकेंची यादी तयार!
3
Raj Thackeray : "कितीही बेताल वक्तव्य केली तरी..."; गांधी जयंतीनिमित्त राज ठाकरेंनी वाचाळवीरांना फटकारलं
4
कमाल! WhatsApp ची मोठी घोषणा, Video कॉलचा आनंद द्विगुणित; बदलणार चॅटिंगचा एक्सपीरियंस
5
T20 WC 2024 : भारताचा विजयरथ! न्यूझीलंड, आफ्रिकेविरुद्ध 'भारी' सराव; गुरुवारपासून स्पर्धेचा थरार
6
फक्त 6 तास अ्न मोसाद इराणचे 100000 हून अधिक सीक्रेट न्यूक्लिअर डॉक्यूमेन्ट घेऊन 'भूर्र'; माजी राष्ट्रपतींचा दावा
7
गोविंदा गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट, पोलिसांनी व्यक्त केला संशय
8
मुलगी झाली हो..! खुशबू तावडे आणि संग्राम साळवी दुसऱ्यांदा झाले आई-बाबा
9
गुरु-शनी गोचर: ८ राशींचा सुवर्णकाळ, धनलक्ष्मी भरभरुन देईल; नवदुर्गा कृपा करेल, दसरा शुभ होईल!
10
इराण-इस्रायल या दोन्ही दैशांपैकी भारताचा सर्वात जवळचा मित्र कोण?; जाणून घ्या
11
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय तरी काय? आता Babar Azam चा कर्णधारपदाचा राजीनामा!
12
गोविंदाला कधी मिळणार डिस्चार्ज? अभिनेत्याच्या तब्येतीविषयी पत्नी सुनिता आहुजा यांनी दिली माहिती
13
"शिवसेनेमुळे माझा पराभव झाला", समरजित सिंह घाटगेंचं मोठं विधान
14
धक्कादायक माहिती! 'त्या' दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरने सुनील तटकरे करणार होते प्रवास
15
Irani Cup 2024 : अजिंक्य रहाणेचे शतक थोडक्यात हुकले! पण सर्फराजने गड गाठलाच; ऋतुराजचा संघ अडचणीत
16
Video - "मला ४० लाख..."; कर्ज फेडण्यासाठी Axis बँकेत घातला दरोडा, मॅनेजरला दिली धमकी
17
'चिप'सारख्या वस्तुंमध्ये कटाची भीती! इस्त्रायलच्या पेजर स्फोटानंतर चीनबाबत सरकार अलर्टवर
18
'...ही चूक पुन्हा झाल्यास कठोर कारवाई होणार'; Suzlon Energy ला BSE, NSE चा इशारा
19
'शिवसेनेमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्ता मिळाली', ठाकरेंचा नेता मुख्यमंत्रि‍पदाबद्दल काय बोलला?
20
स्वत:च शिवली वर्दी, पैशांबाबत बोलला खोटं; २ लाखांत IPS झालेल्या मिथिलेशच्या कहाणीत नवा ट्विस्ट

तंबाखूमुक्त शाळा अभियान कार्यशाळा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 4:53 AM

याप्रसंगी राऊत यांनी, सुधारित ९ निकषांप्रमाणे शाळा तंबाखू मुक्त करण्यासाठी सर्व मुख्याध्यापकांनी प्रयत्न करावेत. त्यामुळे लवकरच जिल्हा तंबाखूमुक्त शाळांचा ...

याप्रसंगी राऊत यांनी, सुधारित ९ निकषांप्रमाणे शाळा तंबाखू मुक्त करण्यासाठी सर्व मुख्याध्यापकांनी प्रयत्न करावेत. त्यामुळे लवकरच जिल्हा तंबाखूमुक्त शाळांचा जिल्हा घोषित करण्यात येईल, असे आवाहन केले. देवरूखकर यांनी, केंद्र शासनाच्या आरोग्य मंत्रालय व महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने सुधारित ९ निकष संदर्भात शाळा शासन परिपत्रकाप्रमाणे तंबाखूमुक्त कराव्यात, असे सांगितले, तसेच निकष कसे करावे व तंबाखूमुक्त शाळा ॲपवर कसे अपलोड करावे, याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. डॉ.गभने यांनी, शाळा व मुख्याध्यापकांना येणाऱ्या अडचणी, निकष करताना येणाऱ्या अडचणींवर संस्थांची, आरोग्य विभागाची व कार्यकर्त्यांची कशी मदत घेता येईल, हे सांगितले. यलो लाइन संदर्भात जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाचे डॉ.अनिल आटे यांच्याशी संपर्क करावा, असेही सुचविले. कार्यशाळेसाठी गट साधन केंद्राचे गटसमन्वयक व्ही.बी. परतेकी, साधनव्यक्ती रविशंकर पटले, केंद्रप्रमुख डी.बी.खोब्रागडे, के.एस.फुने, आरोग्य प्रबोधिनीच्या अर्चना गभने, आरती पुराम यांनी सहकार्य केले.

--------------------------

हे आहेत तंबाखूमुक्त शाळेचे निकष

शैक्षणिक संस्थेच्या आवारात ६०-४५ सेंटिमीटर आकाराचा तंबाखूमुक्त परिसरचा फलक असावा. या फलकावर अधिकृत व्यक्तीचे नाव, हुद्दा, संपर्क क्रमांकाचा उल्लेख असावा. तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्था प्रवेशद्वाराच्या सीमेवर किंवा शैक्षणिक संस्थेच्या बाह्य भिंतीवर ६०-४५ सेंटिमीटर आकाराचा फलक लावलेला असावा. या फलकावर अधिकृत व्यक्तीचे नाव, पदनाम, संपर्क क्रमांकाचा उल्लेख असावा. शैक्षणिक संस्थेच्या आवारात तंबाखूजन्य पदार्थांच्या वापराचा पुरावा असू नये. सिगारेट बिडीचे तुकडे, गुटखा तंबाखूचे पाउच, भिंतीवर त्याचे डाग इत्यादी असू नयेत. तंबाखूच्या दुष्परिणामावर आधारित साहित्य प्रदर्शन असावे. शैक्षणिक संस्थेत गेल्या ६ महिन्यांत तंबाखू नियंत्रणावर आधारित किमान १ उपक्रम राबविणे. शैक्षणिक संस्थेने अधिकृत व्यक्ती तंबाखू माॅनिटर म्हणून कर्मचाऱ्यांमधून अधिकारी, शिक्षक किंवा विद्यार्थी प्रतिनिधी मधील नेमले पाहिजेत आणि संपर्क क्रमांक नमूद केले जावेत. तंबाखूचा वापर शाळेच्या परिसरात केला जाणार नाही, हा नियम शैक्षणिक संस्थेच्या आचारसंहितेमध्ये समाविष्ट केला गेला पाहिजे. शैक्षणिक संस्थेच्या बाह्य भिंतीपासून १०० यार्ड क्षेत्र रेखांकित केले गेले पाहिजे, तसेच तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणारे कोणतेही दुकान शैक्षणिक संस्थेच्या १०० यार्डात नसावे.