शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाने जे ठाकरेंसोबत केले, तसेच आता शिंदेंशी वागतायत का? शिंदे गटाचे नेते म्हणाले...
2
एकनाथ शिंदे यांची दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद, मोठा निर्णय जाहीर करणार? 
3
मुख्यमंत्री कोण होणार? लवकरच उत्तर मिळेल; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य
4
काय आहे 'वन नेशन, वन सबस्क्रिप्शन' योजना, कोणाला होणार फायदा?
5
IPL Auction 2025: धडामsss ! मॅक्सवेल ते स्टार्क… ‘या’ ५ बड्या खेळाडूंचा भाव ‘धाडकन्’ कोसळला..!!
6
Enviro Infra Engineers IPO Allotment : एन्व्हायरो इन्फ्रा IPO चं अलॉटमेंट झालीये का? कसं चेक कराल, जाणून घ्या 
7
६ बहिणींचं लग्न, ४ भावांचं शिक्षण; अपघातात मृत्यू झालेल्या डॉक्टरची डोळे पाणावणारी गोष्ट
8
'सर्वात मोठा पक्ष कोणताही असेल, मुख्यमंत्री तुम्हीच होणार'; निवडणुकीपूर्वी भाजपाने शिंदे शिवसेनेला शब्द दिलेला?
9
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
10
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"
11
"राज ठाकरे यांना फसवलं, इव्हीएममुळेच महायुती जिंकली’’, मनसेचा गंभीर आरोप
12
'पुष्पा 2'नंतर 'पुष्पा 3' येणार की नाही? अल्लू अर्जुनच्या पोस्टमधून चाहत्यांना मिळालं उत्तर
13
Jacqueline Fernandez : "तिला काहीच..."; सुकेशकडून महागड्या भेटवस्तू घेणाऱ्या जॅकलिन फर्नांडिसच्या वकिलांचा युक्तिवाद
14
IRCTC ची ब्लॅक फ्रायडे ऑफर, स्वस्तात मिळेल फ्लाइट तिकीट आणि 'ही' सुविधा...
15
गुरु प्रदोष: ८ राशींना अचानक धनलाभ योग, शुभ घडेल; इच्छापूर्ती, दत्तगुरु-महादेवांची कृपा!
16
"बाप आखिर बाप होता है", मुलगी पराभूत झाल्यानंतर विजयी पित्याचे बॅनर चर्चेत!
17
 स्वबळावर बहुमताजवळ, तरीही मुख्यमंत्रिपदावर अडलंय घोडं, भाजपासमोर आहेत या अडचणी
18
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
19
ऐश्वर्या रायबाबत भावजयचीही क्रिप्टिक कमेंट, अभिनेत्रीसोबत कधीच फोटो शेअर करत नाही; कारण...
20
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम

११६५ शाळांना तंबाखूमुक्तीचे वेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 9:42 PM

व्यक्तीमत्व विकासात शारीरीक आरोग्य अत्यंत महत्वाचे आहे. आपल्या शरीरातील विविध इंद्रिय संस्था सुरळीतपणे कार्य करतात तेव्हा आपले आरोग्य चांगले आहे असे आपण म्हणतो. परंतु धुम्रपान, तंबाखूसेवन व मद्यपान यासारख्या घातक सवयी आरोग्यास बिघडवितात.

ठळक मुद्देसंकल्प तंबाखूमुक्त जीवनाचा : १५ टक्के कुमारवयीन मुलांना व्यसन

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : व्यक्तीमत्व विकासात शारीरीक आरोग्य अत्यंत महत्वाचे आहे. आपल्या शरीरातील विविध इंद्रिय संस्था सुरळीतपणे कार्य करतात तेव्हा आपले आरोग्य चांगले आहे असे आपण म्हणतो. परंतु धुम्रपान, तंबाखूसेवन व मद्यपान यासारख्या घातक सवयी आरोग्यास बिघडवितात. शाळेत जाणाऱ्या १५ टक्के कुमारवयीन मुलांना तंबाखूचे व्यसन असल्याचे वास्तव पुढे आल्याने आता शाळाच तंबाखुमुक्त करण्याचा उपक्रम शासनाकडून राबविला जात आहे. गोंदिया जिल्ह्यातील १६८१ पैकी ११६५ शाळांनी आपली शाळा तंबाखूमुक्त करण्याचा ध्यास धरला आहे.दरवर्षी जगात जवळ-जवळ ६४ लाख लोक तंबाखूमुळे मरतात. सन २०३० पर्यंत जगात तंबाखूने मरणाºयांची संख्या वर्षाकाठी ८० लाख होणार आहे. भारतात दररोज २ हजार ५०० लोकांचा तंबाखूने मृत्यूने होतो. वर्षाकाठी १० लाखाहून अधिक लोक तंबाखूने एकट्या भारतात मरण पावतात. तंबाखूमुळे होणाºया तोंडाचा कर्करोगाचे सर्वाधीक रूग्ण भारतात आहेत. इंटरनॅशनल एजंसी फॉर रिसर्च आॅन कॅन्सर आणि जागतिक आरोग्य संघटनेनुसार धुम्रपानात ४ हजारांहून अधिक रसायने असल्याचे सांगण्यात आले.धुम्रपानात ८० आणि धुम्ररहित तंबाखू पदार्थात २८ कर्कजनक रसायने असतात. कोणताही प्राणी तंबाखूची पाने खात नाही. सापही तंबाखूच्या शेतात जात नाही. तरीही सर्वात सुज्ञ समजला जाणारा मनुष्य तंबाखूचे सेवन करून स्वत:चेच जीवन नरकमय बनवित आहे. या तंबाखूच्या व्यसनापासून उद्याची पिढी म्हणजे किशोरवयीन मुले व शिक्षकांना यापासून दूर ठेवण्यासाठी शासनाने शाळेत आता तंबाखूमुक्त शाळा अभियान राबविणे सुरू केले आहे. या अभियानाला यशस्वी करण्यासाठी गोंदिया जिल्ह्याचा संपूर्ण शिक्षण विभाग कामाला लागला आहे.गोंदिया जिल्ह्यातील १ हजार ६८१ शाळा तंबाखूमुक्त करण्याचा माणस शिक्षण विभागाचा आहे. या तंबाखूमुक्त शाळांसाठी शासनाने ११ निकष ठेवले आहेत. त्या निकषांची पुर्तता करून त्याची माहिती अ‍ॅपवर अपलोड करून आपल्या शाळेला तंबाखूमुक्त शाळा घोषीत करण्याच्या स्पर्धेत ११६५ शाळा उतरल्या आहेत. यातील ९६५ शाळांनी सर्व ११ निकष भरले आहेत.यातील १५५ शाळांनी चुकीचे निकष भरल्याची माहिती पुढे आली आहे. फक्त २४ शाळांनी सर्व निकषाची माहिती तंतोतंत पूर्ण भरली आहे. तर ५५५ शाळांची तंबाखूमुक्त शाळांसाठी तपासणी व्हायची आहे.तंबाखूमुळे होणारे दुष्परीणामतंबाखू सेवनामुळे केस व तोंडाची दुर्गंधी येते. दात सडतात, हिरड्यांना इजा होऊन दात निकामी होवून त्यांची मजबूती नष्ट होते. चॉकलेटी-पिवळे दात पडतात. वास घेण्याची क्षमता कमी होते. चेहºयावर सुरकुत्या पडतात. शरीरात अशक्तपणा जाणवतो. हाडे ठिसूळ होतात व रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ लागते. डोळ्यांमध्ये जळजळ होत डोळ्यातून पाणी येते. निकोटीनच्या प्रभावामुळे मेंदूच्या कार्यावर विपरीत परिणाम होतो. विचार करण्याची क्षमता कमी होते. चित्त एकाग्र करणे कठिण जाते. तंबाखूमुळे तोंड, स्वरयंत्र, फुप्फुस, गळा, अन्ननलीका, मूत्राशय, मूत्रपिंड, नाक, पोट, गर्भाशय व मुखाचा कॅन्सर होतो. गँगरिन, क्षयरोग, दमा, हृदयविकार, उच्च रक्तदाब, लकवा, मधूमेह व मोतीबिंदू होते. पुरूषांच्या शुक्राणूंची संख्या कमी होत जाते व पुरूष नपुंसक बनतो. ज्या स्त्रिया तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करतात त्यांची प्रजनन क्षमता कमी होते व त्यांना वंधत्व येते.तंबाखू सोडण्यासाठी हे करातंबाखू सोडण्याचा विचार करणाºया व्यक्तींनी तंबाखू सोडण्याच्या तारखेची घोषणा आपल्या कुटुंबियांसमोर, नातलगांसमोर किंवा मित्रांसमोर करावी. तंबाखूसाठी प्रवृत्त करतील अशा लोकांपासून दूर रहावे. तंबाखू सेवनाची इच्छा झाल्यास १ ते १०० अंक मोजावे, दोरीवरील उड्या व प्राणायाम करावे. कुरमुरे, चणे, शेंगदाणे, बडीशेप या पदार्थाचे सेवन करावे. तंबाखू सेवनाने शरीरात अस्तीत्वात असणारी विषारी रसायने शरीरातून बाहेर टाकण्यासाठी जास्तीतजास्त पाणी प्यावे. योग्य मित्रांसोबत आपले विचार व भावना शेअर कराव्या.तंबाखू आणि धुम्रपानात आढळणारी जीवघेणी रसायनेनिकोटीन : हे नशा आणणारे रसायन आहे. शरीरात निकोटीनचे प्रमाण कमी झाल्यावर व्यक्ती बैचेन होते. अस्वस्थता वाढते आणि त्यामुळे व्यक्तीला पुन्हा-पुन्हा तंबाखू सेवन करण्याची इच्छा होते.हाईड्रोजन सायनाइट : विषगृहात प्रयोगात येणारा विषारी वायू असतो.अमोनिया : फरशी व स्वच्छतागृहे इत्यादी स्वच्छ करण्यासाठी वापरल्या जाणाºया द्रव्यातील रसायन तंबाखूमध्ये असतो.आर्सेनिक : मुंग्यांना मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या द्रव्यातील विषारी रसायन.नेप्थेलीन : कापडातील किटाणूंना मारण्यासाठी वापरल्या जाणाºया गोळ्यात असणारे रसायन.कॅडमियम : कारच्या बॅटरीत आढळणारे रसायन.अ‍ॅसीटोन : भिंतीवरील रंग काढण्यासाठी वापरण्यात येणाºया द्रव्यातील रसायन.कार्बन मोनोक्साईड : कारच्या धुरातील विषारी वायू.डीडीटी : किड्यांना मारण्यासाठी वापरात येणारे रसायन.बुटेन : इंधन म्हणून वापरण्यात येते.

टॅग्स :Smokingधूम्रपान