संस्काराचे मोती स्पर्धा : गेल्यावर्षी झाली होती जिल्हाभरातून निवडगोंदिया : शालेय विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घालणाऱ्या आणि त्यांच्यावर सुसंस्कार रुजविणाऱ्या ‘लोकमत संस्काराचे मोती’ या स्पर्धेतून गेल्यावर्षी गोंदिया जिल्ह्यातून हवाई सफरीसाठी निवड झालेल्या देवेंद्र विष्णुदास पवार हा विद्यार्थी शुक्रवार दि.२४ रोजी विमानाने राजधानी दिल्ली येथे जाणार आहे.स्थानिक कुडवा भागातील इंदिराबेन एच. पटेल या प्राथमिक शाळेचा विद्यार्थी असलेला देवेंद्र जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागातील सहायक प्रशासन अधिकारी व्ही.एस.पवार यांचा चिरंजीव आहे.देवेंद्रने लोकमतच्या संस्काराचे मोती स्पर्धेत भाग घेऊन सर्व कुपन चिकटवून या स्पर्धेत भाग घेतला होता. यावर्षीही ही स्पर्धा होणार असून त्यात वर्ग २ ते वर्ग ८ पर्यंतच्या विद्यार्थ्यांना सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.देवेंद्र दिल्ली येथे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना भेटणार असून विविध स्थळांची पाहणी करणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
गोदियाच्या देवेंद्रची आज ‘लोकमत’तर्फे हवाई सफर
By admin | Published: June 24, 2016 12:05 AM