लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : ‘लॉकडाऊन’मुळे बंद असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बस फेºया बुधवारपासून (दि.६) सुरू होत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत तसे आदेश आगाराला दिले आहेत. यांतर्गत सुरूवातीला २५ फेऱ्या सुरू केल्या जाणार असून पुढे प्रवासी संख्या बघून त्यात वाढ करता येणार आहे. त्यामुळे महिनाभरानंतर आता परिवहन महामंडळाची लालपरी बुधवारपासून पुन्हा सेवेत येणार आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्याची साखळी तोडणे गरजेचे आहे. ही साखळी तोडण्यासाठी ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ हाच एकमेव उपाय असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ मार्चपासून अवघ्या देशात ‘लॉकडाऊन’ केला होता. यांतर्गत त्यांनी रेल्वे, जहाज, बस व विमान सेवाही बंद करण्यात आली होती. परिणामी ‘लॉकडाऊन’पासून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस पूर्णपणे बंद होत्या. मात्र याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होत असल्याने ती डबघाईस आली आहे. ती रूळावर आणण्यासाठी आता शासनाकडून आॅरेंज व ग्रीन झोनमध्ये काही सेवा सुरू करण्यास तयारी दर्शविली आहे. गोंदिया जिल्हा ग्रीन झोनमध्ये असल्याने जिल्ह्यात शिथिलता देण्यात आली असून बस सेवा सुरू करण्यासाठी आदेश देण्यात आले आहे. त्यानुसार, जिल्हाधिकाऱ्यांनी गोंदिया आगाराला मंगळवारी (दि.५) जिल्ह्यातंर्गत बस फेºया बुधवारपासून (दि.६) सुरू करण्याचे आदेश दिले आहे. यांतर्गत बुधवारी २५ फेऱ्या सुरू केल्या जाणार असून प्रवासी संख्या बघता त्यात वाढ केली जाणार असे आगार प्रमुख संजना पटले यांनी सांगीतले.प्रवाशांसाठी होणार सोयीचेसध्या प्रवासाची साधने बंद असल्याने स्थलांतर करीत असलेल्या मजुरांना शिवाय अन्य सर्वसामान्य नागरिकांना त्रास होत आहे. मजुरांचे लोंढे तर पायी-पायीच जाताना दिसत आहेत. मात्र लालपरी बुधवारपासून प्रवाशांच्या सेवेत येणार असल्याने त्यांना सोयीचे होणार आहे. महिनाभर बसेस बंद असल्याने आगाराला कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. त्यात आता बस फेºया सुरू होणार असल्याने राज्याला आर्थिक उत्पन्न मिळणे सुरू होणार आहे.
आजपासून लालपरी धावणार रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2020 5:00 AM
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्याची साखळी तोडणे गरजेचे आहे. ही साखळी तोडण्यासाठी ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ हाच एकमेव उपाय असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ मार्चपासून अवघ्या देशात ‘लॉकडाऊन’ केला होता. यांतर्गत त्यांनी रेल्वे, जहाज, बस व विमान सेवाही बंद करण्यात आली होती. परिणामी ‘लॉकडाऊन’पासून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस पूर्णपणे बंद होत्या.
ठळक मुद्देफक्त जिल्ह्यातंर्गत फेऱ्यांची सूट : प्रवासी संख्या बघून होणार वाढ, सुरूवातीला २५ फेऱ्या