लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : भंडारा-गोंदिया लोकसभेच्या पोटनिवडणुकीत मतदानाच्या हक्कापासून वंचीत राहिलेल्या मतदारांना निवडणूक आयोगाने मतदानाची संधी दिली आहे. मशिनमध्ये बिघाड आल्याने मतदान थांबविण्यात आलेल्या जिल्ह्यातील ३१ मतदान केंद्रांवर बुधवारी (दि.३०) नियमित वेळेत फेरमतदान घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहे.भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रासाठी सोमवारी (दि.२८) पोटनिवडणूक घेण्यात आली. मात्र मतदानांतर्गत जिल्ह्यातील कित्येक मतदान केंद्रांवरील ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशिनमध्ये बिघाड आला होता.परिणामी मतदान प्रक्रियेवर त्याचा परिणाम झाला होता. यातील बहुतांश केंद्रांवरील मशिनची दुरूस्ती करून यंत्रणेने मतदान करवून घेतले होते. मात्र जिल्ह्यातील ३१ केंद्रांवरील मशिनची दुरूस्ती होऊ न शकल्यामुळे या मतदान केंद्रांवरील मतदान थांबविण्याचे आदेश उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिले होते. यामुळे कित्येक मतदारांना आल्यापावली परत जावे लागले होते. शिवाय त्यांना मतदानाच्या हक्कापासून वंचीत ठेवण्यात आल्याने पुन्हा मतदान घेण्याची मागणी केली जात होती. दरम्यान निवडणूक आयोगाने या ३१ केंद्रांवर बुधवारी (दि.३०) पुन्हा मतदान घेण्याचे आदेश दिले आहे.विशेष म्हणजे, मतदान केंद्रांत कुठलाच बदल करण्यात आला नसून मतदारांना सोमवारी (दि.२८) होत्या त्या केंद्रांवरच मतदान करता येणार आहे. त्यातही मतदानाची वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजताचीच राहणार आहे. तर अर्जुनी-मोरगाव विधानसभा क्षेत्रासाठी मात्र मतदानाची वेळ सकाळी ७ ते दुपारी ३ वाजताचीच राहणार आहे.या केंद्रांसाठी होणार मतदानजिल्ह्यातील ३१ मतदान केंद्रांवरील मतदान रद्द करण्यात आल्याने हे पुर्नमतदान होत असून यात अर्जुनी-मोरगाव विधानसभा क्षेत्रातील केंद्र क्रमांक १०८ व १५९; तिरोडा विधानसभा क्षेत्रातील केंद्र क्रमांक ४५, ९७, १०२, १०८, २०५, २१५, ३८, ५२ तसेच गोंदिया विधानसभा क्षेत्रातील केंद्र क्रमांक ५०, ७८, ९४, ११५, ११६, ११७, १२३, १६९, १७६ (अ), १९४, २००, २०६, २१८, २२५, २३३, २४०, २५०, २५३, २७१, २७६ व ३०३ अशा एकूण ३१ केंद्रांचा समावेश आहेपोटनिवडणुकीसाठी ५३.१५ टक्के मतदानसोमवारी (दि.२८) पार पडलेल्या मतदानांतर्गत भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रात एकूण ५३.१५ टक्के मतदान करण्यात आल्याची नोंद आहे. यात, अर्जुनी-मोरगाव विधानसभा क्षेत्रात सर्वाधीक ५७.९४ टक्के मतदान करण्यात आले आहे. त्यानंतर तिरोडा विधानसभा क्षेत्रात ५५.२७ टक्के तर सर्वात कमी ४४.८७ टक्के मतदानाची नोंद गोंदिया विधानसभा क्षेत्रात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, गोंदिया विधानसभा क्षेत्रातील २१ मतदान केंद्रांवरील मतदान मशिन मधील बिघाडामुळे थांबविण्यात आले होते. त्याचाही परिणाम गोंदिया विधानसभा क्षेत्रातील मतदानावर जाणवला.
३१ केंद्रांवर आज फेरमतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 9:50 PM
भंडारा-गोंदिया लोकसभेच्या पोटनिवडणुकीत मतदानाच्या हक्कापासून वंचीत राहिलेल्या मतदारांना निवडणूक आयोगाने मतदानाची संधी दिली आहे. मशिनमध्ये बिघाड आल्याने मतदान थांबविण्यात आलेल्या जिल्ह्यातील ३१ मतदान केंद्रांवर बुधवारी (दि.३०) नियमित वेळेत फेरमतदान घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहे.
ठळक मुद्देमतदानाचा हक्क बजावण्याची संधी : मतदान केंद्र तेच राहणार