लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नगर परिषदेच्या स्थायी समितीची सभा बुधवारी (दि.१६) आयोजित करण्यात आली आहे. विविध विभागातील ३२ विषयांवर या सभेत चर्चा करून मंजुरी दिला जाणार आहे. विशेष म्हणजे, यातील काही विषय शहरासाठी महत्त्वाचे असल्याने स्थायी समितीच्या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.नगराध्यक्ष अशोक इंगळे यांनी बुधवारी (दि.१६) स्थायी समितीची सभा बोलाविली आहे. एकूण ३२ विषयांवर बोलाविण्यात आलेल्या या सभेत काही विषय महत्वपूर्ण दिसून येत आहेत. यात नगर परिषदेत कार्यरत रोजंदारी कर्मचाऱ्यांना किमान वेतन कायद्यानुसार अद्ययावत दर लागू करणे, पथदिव्यांना नवीन स्वीच बॉक्स बसविणे, इंदिरा गांधी स्टेडियममधील फ्लड लाईट व जनरेटरची देखभाल दुरूस्ती करणे, स्वच्छ सर्वेक्षण २०१९ करिता विविध कामे करण्याची परवानगी देणे, शहरातील बांधकाम साहित्य उचलून फेकण्यासाठी दर ठरविणे व शहरातील हॉटेल व रेस्टॉरेंटकडून ओला-सुका कचरा उचलण्याबाबत दर ठरविणे, नगर परिषद कॉन्व्हेंट करिता शासनाच्या जीईएम पोर्टल वरून दरपत्रकाद्वारे घेण्यात आलेल्या शैक्षणिक साहित्य दरास मंजुरी देणे, नगर परिषद क्षेत्रात असलेल्या सर्व अंगणवाड्यांमध्ये मुलांसाठी शैक्षणिक साहित्य व प्रत्येक प्रभागात खुर्च्या पुरविणे, विविध विभागामार्फत आमंत्रीत निविदेतील प्राप्त कमी दरास मंजुरी व मुदतवाढ देणे यांचा समावेश असून अन्य काही विषय मांडले जाणार आहेत. दरम्यान काही विषयांवर सत्ताधाºयांची कोंडी करण्याची तयारी विरोधकांनी केली आहे.बाजारात महिलांसाठी रेडिमेड टॉयलेटबाजारात महिलांसाठी विशेष शौचालय नसल्याने महिलांची कुचंबना होत आहे. यामुळे बाजारात महिलांसाठी शौचालय बांधकाम किंवा शौचालयांची व्यवस्था करावी अशी मागणी मागील कित्येक वर्षांपासून केली जात आहे. मात्र नगर परिषदेकडून यावर कुठलीच पावले उचलण्यात आलेली नाहीत. अखेर या प्रकारावर दखल घेत महिला व बाल कल्याण विभागाकडून बाजारात महिलांसाठी रेडिमेड टॉयलेट लावण्याचा विषय सभेत मांडला जाणार आहे.जाहिरात करवसुली कंत्राटी पद्धतीनेशहरात सध्या कोणत्याही जागेवर कुणीही आपले होर्डींग, बॅनर व पोस्टर लावून जाहिरातबाजी करीत आहेत. यात मात्र शहराचे विद्रुपीकरण होत आहे. तर याचा नगर परिषदेला आर्थिक फटकाही बसत आहे. अशात शहरातील या अवैध जाहिरातबाजीवर नियंत्रण बसावे व नगर परिषदेला आर्थिक उत्पन्न मिळावे या दृष्टीने जाहिरातींची कर वसुली करण्यासाठी कंत्राट देण्याचा विचार केला जात असून यासाठी दरास मंजुरी देण्याचा विषय सभेत मांडला जाणार आहे.संभावित पाणीटंचाईची दखलउन्हाळयात निर्माण होणाऱ्या संभावित पाणी टंचाईची समस्या लक्षात घेत शहरात नवीन विंधन विहीर बांधकाम खोदकामांचा विषय मांडला जाणार आहे. याशिवाय हातपंप व पंपहाऊस दुरूस्ती कामासाठी ई-निविदेतील दरास मुदतवाढ देणे तसेच सन २०१८-१९ मध्ये पंपहाऊसला नवीन मोटार व वॉर्डात पाईप लाईन टाकण्यात आली असून त्या खर्चास मंजुरी देण्याबाबत सभेत चर्चा केली जाणार आहे.
नगर परिषदेच्या स्थायी समितीची आज सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 1:01 AM
नगर परिषदेच्या स्थायी समितीची सभा बुधवारी (दि.१६) आयोजित करण्यात आली आहे. विविध विभागातील ३२ विषयांवर या सभेत चर्चा करून मंजुरी दिला जाणार आहे. विशेष म्हणजे, यातील काही विषय शहरासाठी महत्त्वाचे असल्याने स्थायी समितीच्या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ठळक मुद्देविविध विभागातील ३२ विषय : विरोधक आक्रमक, सभेकडे शहरवासीयांचे लक्ष