शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
2
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
3
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
4
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
5
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
6
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
7
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
8
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
9
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
10
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
11
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
12
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
13
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
14
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
15
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
16
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
17
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
18
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
19
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
20
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 

शौचालय बांधकामाला निधीचा अडसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2016 1:45 AM

स्वच्छ महाराष्ट्र मिशन अंतर्गत शहरातील नागरी शौचालय बांधकाम अभियान राबविले जात आहे.

निधीची मागणी : १६०० शौचालयांचे काम सुरू गोंदिया : स्वच्छ महाराष्ट्र मिशन अंतर्गत शहरातील नागरी शौचालय बांधकाम अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत नगर परिषदेने त्यांच्याकडे आलेल्या अर्जांमधील २२३५ अर्जांची पाहणी केली असून १६०० शौचालयांचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. मात्र शासनाकडून निधी न मिळाल्याने उर्वरीत ६३५ शौचालयांचे काम रखडले आहे. यातून शौचालय बांधकामाला निधीचा अडसर येत असल्याचे दिसून येत आहे. सर्व शहरांमधील नागरिकांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे याकरिता शहरांना स्वच्छता आणि शहरांमधील सर्व नागरिकांना शौचालयांची सुविधा उपलब्ध करून देऊन हे ध्येय गाठण्यासाठी केंद्र शासनाकडून स्वच्छ भारत अभियान संपूर्ण देशात राबविण्यात येत आहे. शहरांत राबविण्यात येणाऱ्या या नागरी स्वच्छ भारत अभियानांतर्गत पात्र लाभार्थी कुटूंबास वैयक्तीक शौचालय बांधकामासाठी अनुदान देऊन शौचालय तयार करवून घेतले जात आहेत. यासाठी नगर पालिका क्षेत्रातील वैयक्तीक शौचालय नसलेल्या व्यक्तींकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. यांतर्गत पलिकेकडे ३७४४ अर्ज आले होते. पालिकेला २७८१ शौचालय बांधकाम करावयाचे असून आलेल्या अर्जातील २२३५ अर्जांची पडताळणी व पाहणी करण्यात आली. मात्र यातील १६०० शौचालयांचे बांधकाम सुरू करण्यात आले असून त्यांना पहिला हप्ता देण्यात आला आहे. त्यानंतर यातील ८०० लाभार्थींना दुसरा हप्ता देण्यात आला असून ४०० लाभार्थींना पालिकेला द्यावयाचा तिसरा हप्ता देण्यात आला आहे. तर ९ जून पर्यंंत यातील ४३७ शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाल्याची माहिती आहे. असे असतानाही ६३५ अर्जदारांचे शौचालयांचे काम पेडींग पडून आहे. यासाठी लागणारा निधी पालिकेकडे नसल्याने हे काम खोळबंत चालले आहे. हे काम सुरू व्हावे यासाठी पालिकेकडून शासनाकडे १.६७ कोटींची मागणी करण्यात आली आहे. हा निधी उपलब्ध झाल्यास उर्वरीत शौचालयांचे बांधकाम सुरू होईल. (शहर प्रतिनिधी)