गोंदिया : इयत्ता ५ वी ते १२ वीच्या शाळा सुरू झाल्या आहेत; परंतु गोंदिया जिल्ह्यातील १०३९ शाळांमध्ये २ हजार ४६० स्वच्छतागृहांची गरज असताना गोंदिया जिल्ह्यातील शाळांत १९९३ स्वच्छतागृहे वापरात आहेत. त्यात मुलांसाठी ९८५, तर मुलींसाठी १००८ स्वच्छतागृह आहेत. ३८२ स्वच्छतागृह वापरायोग्य नसल्याने त्याचा वापर विद्यार्थी करीत नाहीत. त्यात मुलांचे १९६ व मुलींचे १८६ स्वच्छतागृह वापरा योग्य नाहीत. ८५ ठिकाणी स्वच्छतागृहच नाहीत. त्यात मुलांचे ५४, तर मुलींचे ३१ स्वच्छतागृह नाहीत. शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वच्छतागृह नसल्याने विद्यार्थ्यांना उघड्यावर शौचास जावे लागत आहे. वापरात नसलेले ३८२ व स्वच्छतागृहच नसलेले ८५ असे ४६७ स्वच्छतागृहांची गरज गोंदिया जिल्ह्याला आहे. एका स्वच्छतागृहाकरिता कमीत कमी दोन लाख रुपयांची गरज असते. गोंदिया जिल्ह्यात शौचालयासाठी निधीच उपलब्ध नसल्याने जिल्हा नियोजनाच्या निधीची वाट गोंदिया जिल्ह्यातील जि.प. शाळांच्या स्वच्छतागृहांना आहे.
बॉक्स
जिल्हा परिषदेच्या एकूण शाळा - १०३९
मोडकळीस आलेली स्वच्छतागृहे- ३८२
जिल्ह्याला स्वच्छतागृहाची गरज- ४६७
दुरुस्तीसाठी आवश्यक निधी- ९.३४ कोटी
बॉक्स
तालुका दुरवस्था झालेली स्वच्छतागृह स्वच्छतागृहांची गरज
आमगाव ५० ५३
अर्जुनी-माेरगाव २४ ३५
देवरी ६७ ७९
गोंदिया ५७ ९५
गोरेगाव ४३ ५१
सडक-अर्जुनी २४ ३२
सालेकसा ६३ ६६
तिरोडा ५४ ५६
बॉक्स
५४ शाळांमध्ये स्वच्छतागृह नाहीत
जिल्ह्यातील ५४ शाळांमध्ये ८५ स्वच्छतागृहांची गरज असताना त्या ठिकाणी स्वच्छतागृह नाहीत. आमगाव तालुक्यात ३, अर्जुनी-मोरगाव तालुक्यात ११, देवरी १२, गोंदिया तालुक्यात ३८, गोरेगाव तालुक्यात ८, सडक-अर्जुनी तालुक्यात ८, सालेकसा तालुक्यात ३, तिराेडा तालुक्यात २ स्वच्छतागृहांची गरज आहे.