सर्वाधिक मनुष्यदिन निर्मिती : रोजगारमंत्र्यांनी केले पुरस्कृ त दरेकसा : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत सर्वाधीक मनुष्यदिन निर्मिती करीत सालेकसा तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासीबहुल नक्षलग्रस्त टोयागोंदी ग्रामपंचायतने विभागातून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. सन २०१५-१६ या कालावधीत रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचायत टोयागोंदीने नागपूर विभागात सर्वाधीक मनुष्यदिन निर्मिती केली. याबद्दल राज्याच्या नियोजन विभागाकडून (रोजगार हमी योजना) २९ जुलै रोजी मुंबई येथे रोजगार व पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते सरपंच गिता लिल्हारे व सचिव मेश्राम यांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या सत्काराबद्दल मधूकर ओक्टे, पुरूषोत्तम पडौती, भरत लिल्हारे, संतोष पंधरे, अनिल फुंडे, ओमप्रकाश लिल्हारे, रवी सोनवाने परिसरातील नागरिकांनी कौतूक केले आहे. (वार्ताहर)
टोयागोंदी विभागात अव्वल
By admin | Published: August 03, 2016 12:10 AM