नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प : तीन लाख ९५ हजार रूपयांचे उत्पन्न$$्दिेवानंद शहारे ल्ल गोंदियानवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्पात चार अभयारण्य व एका राष्ट्रीय उद्यानाचा समावेश आहे. येथे देशातील पर्यटकांसह दरवर्षी विदेशी पर्यटकही मोठ्या प्रमाणात भेट देतात. वन्यप्राणी पाहण्याची हौस व येथील निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्याचा मोह पर्यटकांना आवरत नाही. त्यामुळे फक्त जानेवारी महिन्यात तब्बल पाच हजार ५५७ देशी-विदेशी पर्यटकांनी व्याघ्र प्रकल्पाला भेट दिल्याची नोंद वन्यजीव विभागाने घेतली आहे. जानेवारी महिन्यात नवेगाव राष्ट्रीय उद्यानाला एकूण ३९८ पर्यटकांनी भेट दिली असून त्यांच्याकडून ११ हजार ३४० रूपयांचा शुल्क वसूल करण्यात आला आहे. नागझिरा अभयारण्याला पाच विदेशी पर्यटकांसह एकूण ८८३ पर्यटकांनी भेटी दिली आहे. त्यांच्याकडून पर्यटन शुल्क म्हणून ३९ हजार ७२५ रूपये वसूल करण्यात आले. नवीन नागझिरा अभयारण्यास तब्बल तीन हजार ५७५ पर्यटकांनी भेट दिली असून त्याद्वारे एक लाख ७४ हजार ८०० रूपयांचा शुल्क वन्यजीव विभागाला मिळाला. नवेगाव अभयारण्याला ३१ पर्यटकांद्वारे केवळ ८१० रूपयांचा महसूल मिळाला. तर कोका अभयारण्याला भेट देणाऱ्या ६७० पर्यटकांद्वारे १८ हजार ३१५ रूपये उपलब्ध झाले. अशा एकूण पाच हजार ५५७ पर्यटकांकडून दोन लाख ४४ हजार ९९० रूपयांचा महसूल वन्यजीव विभागाला मिळाला आहे. त्यातही जड वाहन, हलके वाहन व कॅमेरा शुल्काच्या वसुलीमुळे महसुलात वाढ झाल्याचे दिसून येते. सदर चार अभयारण्य व एका राष्ट्रीय उद्यानात एकूण ९९३ वाहनांद्वारे एक लाख २५ हजार ५० रूपयांचे महसूल मिळाले. तर एकूण २५८ कॅमेऱ्यांद्वारे २५ हजार ८०० रूपयांचा महसूल गोळा झाला. जानेवारी महिन्यातील पर्यटन शुल्क, वाहन व कॅमेरा शुल्कातून एकूण तीन लाख ९५ हजार ८४० रूपयांचा महसूल गोळा झाला आहे.जून ते जानेवारी पर्यंत ३६ हजार ७६५ पर्यटकसन २०१४-१५ मध्ये व्याघ्र प्रकल्पाला ३२ हजार ८६ पर्यटकांनी भेट दिली व याद्वारे १८ लाख ८७ हजार ०६९ रूपयांचा महसूल गोळा झाला होता. सन २०१५-१६ मध्ये ४४ हजार ५४८ पर्यटकांच्या भेटीतून ३४ लाख आठ हजार ८३० रूपये, तर सन २०१६-१७ च्या जानेवारी अखेरपर्यंत ३६ हजार ७६५ पर्यटकांनी भेट दिली व २७ लाख ६९ हजार ६६० रूपयांचा महसूल गोळा झाला. यात आॅक्टोबर २०१६ पर्यंत १९ हजार ३८६ पर्यटकांद्वारे १४ लाख ८७ हजार ९६० रूपये, नोव्हेंबर मध्ये पाच हजार ७७३ पर्यटकांद्वारे चार लाख ४५ हजार ३५० रूपये, डिसेंबर मध्ये सहा हजार ४९ पर्यटकांद्वारे चार लाख ४० हजार ५१६ रूपये प्राप्त झाले.
महिनाभरात ५,५५७ पर्यटकांची जंगल सफारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2017 12:58 AM