लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : जगाचा पोशिंदा शेतकरी सुखी व संपन्न व्हावा, पारंपरिक शेतीला फाटा देऊन यांत्रिकीकरणाच्या साहाय्याने नवनवीन तंत्रशुद्ध पद्धतीने शेती करावी, यासाठी अर्जुनी-मोरगाव तालुका कृषी कार्यालयामार्फत २०१७-१८ या वर्षात १८९ शेतकऱ्यांना ट्रॅक्टर व १३९ शेतकऱ्यांना यांत्रिकी अवजारांचे वाटप करण्यात आले.अर्जुनी-मोरगाव तालुका आदिवासी व नक्षलग्रस्त तालुका आहे. येथील शेतकऱ्यांनी वारंवार एकच पीक न घेता नाविण्यपूर्ण पिकांची लागवड करुन कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन मिळविण्याचे तंत्रशुद्ध नियोजन करण्याचे प्रशिक्षण तालुक्यातील शेतकऱ्यांना सातत्याने दिले जात आहे.शेतीची मशागत करण्यासाठी मनुष्यबळाचा अभाव दिवसेंदिवस जाणवत आहे. उत्पादन खर्चाला कात्री लागावी तसेच शेतीच्या मशागतीमध्ये यांत्रिकीकरण साधनांचा मोठ्या प्रमाणात वापर होण्यासाठी अनुदानावर ट्रॅक्टर व अवजारे वाटप करण्याचा कार्यक्रम राबविण्यात आला.कृषी अभियांत्रिकी योजने अंतर्गत अनुसूचित जाती-जमाती लाभार्थी व सर्वसामान्य महिला शेतकरी लाभार्थ्यांना १ लाख २५ हजार व इतर प्रवर्गातील लाभार्थी शेतकऱ्यांना १ लाखाचे अनुदान दिले जाते. सदर योजनेचा लाभ जिल्ह्यातून सर्वाधिक अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी घेतला. १८९ शेतकऱ्यांना ट्रॅक्टर तर १३९ पात्र शेतकऱ्यांना अवजारांची पूर्तता करण्यात आली.२.७० कोटींचे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरशेतकऱ्यांना ट्रॅक्टर व यांत्रिकीकरण अवजारांचे वाटप करण्यात आले. अशा पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीच्या माध्यमातून अनुदानाची रक्कम जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गोंदिया यांच्या मार्फत जमा करण्याची प्रक्रिया सुरु झाल्याचे तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम यांनी सांगितले. ज्यांना ट्रॅक्टर व अवजारे वाटप झाले त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान राशी जमा करण्याची प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरु आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांना जास्त लाभ देण्यासाठी तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम, मंडळ कृषी अधिकारी संजय रामटेके, नंदकुमार मुनेश्वर, कृषी पर्यवेक्षक ऋषी चांदेवार, ठाकुर, बी.टी. राऊत हे प्रयत्न करीत आहेत.
शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2018 10:16 PM
जगाचा पोशिंदा शेतकरी सुखी व संपन्न व्हावा, पारंपरिक शेतीला फाटा देऊन यांत्रिकीकरणाच्या साहाय्याने नवनवीन तंत्रशुद्ध पद्धतीने शेती करावी, यासाठी अर्जुनी-मोरगाव तालुका कृषी कार्यालयामार्फत २०१७-१८ या वर्षात १८९ शेतकºयांना ट्रॅक्टर व १३९ शेतकऱ्यांना यांत्रिकी अवजारांचे वाटप करण्यात आले.
ठळक मुद्देकृषी विभागाचा उपक्रम : २ कोटी ७० लाखांचे अनुदान