लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सडक-अर्जुनी तालुक्याच्या फुटाळा येथील नदीतून रेतीची तस्करी केली जात आहे. या रेती माफीयांचे ट्रॅक्टर गावकऱ्यांनी पकडून महसूल विभागाच्या स्वाधीन केली. परंतु मंडळ अधिकारी व तलाठ्याने कारवाई न करताच ट्रॅक्टर परत पाठविल्याचा आरोप आहे.३० आॅगस्ट रोजी फुटाळा येथील नदीतून रेती चोरून नेत असताना फुटाळा येथील सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्त समिती तसेच गावकºयांनी त्या ट्रॅक्टरला अडविले. रेती वाहून नेणाऱ्यांकडे रॉयल्टी नसतांना रेतीची वाहतूक केली जात होती. या घाटाचा लिलाव झाला नसताना रेतीची चोरी होत असताना पाहून गावकऱ्यांनी तहसीलदार सडक-अर्जुनी यांना फोन केला.तहसीलदार यांनी त्या परिसरातील मंडळ अधिकारी जांभूळकर, तलाठी रहांगडाले यांना घटनास्थळी पाठविले.मंडळ अधिकारी व तलाठी घटनास्थळावर पोहचून त्यांनी रॉयल्टी विचारली असता त्या ट्रॅक्टर चालकांकडे रॉयल्टी नव्हती. मंडळ अधिकारी व तलाठी यांनी सदर ट्रॅक्टरवर कारवाई न करताच ट्रॅक्टरमध्ये भरलेली रेती खाली करून ट्रॅक्टर घरी परत नेण्यास सांगितले.सदर ट्रॅक्टरवर कारवाई न झाल्यामुळे ग्रामपंचायत फुटाळाचे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील व गावकरी यांनी यासंदर्भात तहसीलदार, पोलीस ठाणे येथे तक्रार केली. तलाठी, मंडळ अधिकारी व रेती माफियांवर कारवाई न झाल्यास तिव्र आंदोलन करू असा इशारा गावकºयांनी दिला आहे. दरम्यान याची दखल घेण्याची मागणी आहे.गावकऱ्यांनी केली चित्रफित तयारफुटाळा येथील रेतीची तस्करी होत असताना पकडलेल्या ट्रॅक्टरवर मंडळ अधिकारी व तलाठी काय कारवाई करतात, याची चित्रफित गावºयांनी तयार केली आहे. तलाठी व मंडळ अधिकारी यांनी रेती खाली करू कारवाई न करताच ट्रॅक्टर कसे परत पाठविले याची संपूर्ण चित्रफित तयार केली आहे. याची माहिती अधिकाºयांना देण्यात आली आहे.
कारवाई न करताच सोडले ट्रॅक्टर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2018 9:36 PM
सडक-अर्जुनी तालुक्याच्या फुटाळा येथील नदीतून रेतीची तस्करी केली जात आहे. या रेती माफीयांचे ट्रॅक्टर गावकऱ्यांनी पकडून महसूल विभागाच्या स्वाधीन केली. परंतु मंडळ अधिकारी व तलाठ्याने कारवाई न करताच ट्रॅक्टर परत पाठविल्याचा आरोप आहे.
ठळक मुद्देगावकऱ्यांचा आक्रोश : भरपावसाळ्यात रेतीची तस्करी सुरू