ऑनलाईन लोकमतगोंदिया : ‘भय्या गाडी कितने बजे आएगी...’ नेत्रहिनांकडून नेहमीच रेल्वे गांड्यांची स्थिती जाणून घेण्यासाठी नागरिकांकडे अशी मदत मागीतली जाते. याला मदत म्हणा किंवा विनवणी यामागचे शल्य त्या नेत्रहिनालाच कळते. मात्र आता त्यांची ही कमजोरी त्यांना अधीक कमजोर बनवू नये यासाठी रेल्वे विभागाने मदतीचे पाऊल उचलले आहे. यासाठी रेल्वे विभागाने स्थानकांवर ब्रेललिपी संकेत बोर्ड लावले आहेत. नेत्रहिन यावरून गाड्यांची स्थिती कुणाच्याही मदतीशिवाय आता जाणून घेतील हे विशेष.दिव्यांगांच्या सोयीसाठी रेल्वे विभागाकडून रेल्वे स्थानकावर व्हील चेयर व विशेष वाहनाची व्यवस्था केली जाते. त्याचा फायदा आजारी व वयोवृद्धांनाही मिळतो. मात्र नेत्रहिनांच्या कामाची हि सुविधा नसते. नेत्रहिनांना फक्त गाड्यांची पोजीशन जाणून घेण्यात त्रास होतो. हे जाणून घेण्यासाठी त्यांना अन्य व्यक्तीला विचारावे लागते. यासाठी त्यांना विनवनीही करावी लागते. यामागचे शल्य त्यांचे त्यांनाचा ठाऊक असते.नेमकी ही बाब हेरून रेल्वे विभागाने नेत्रहिनांच्या मदतीसाठी पाऊल उचलले आहे. यांतर्गत रेल्वे विभागाने दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळातील गोंदिया, भंडारा रोड, कामठी, डोंगरगड, राजनांदगाव, बालाघाट व छिंदवाडा रेल्वे स्थानकावर ब्रेललिपी संकेत बोर्ड लावले आहेत. या स्पर्शनीय बोर्डांच्या माध्यमातून नेत्रहिन नक्शे व गाड्यांची स्थिती कुणाच्याही मदतीशिवाय जाणून घेतील.यासाठी मंडळ रेल प्रबंधक अमित अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक अर्जुन सिबल यांच्या नेतृत्वात ही सुविधा प्रदान करण्यात आली आहे.दोन नकाशे व १२३ ब्रेललिपी बोर्डरेल्वे विभागाने नेत्रहिनांच्या मदतीसाठी गोंदियात दोन स्पर्शनीय नकाशे व १२३ ब्रेललिपीयुक्त संकेत बोर्ड लावले आहेत. याशिवाय भंडारा रोड स्थानकावर एक नकाशा व ५० बोर्ड, बालाघाट स्थानकावर एक नकाशा व ४२ बोर्ड, कामठी येथे एक नकाशा व ३४ बोर्ड, छिंदवाडा येथे एक नकाशा व ५९ बोर्ड, राजनांदगाव येथे दोन नकाशे व ४१ बोर्ड तसेच डोंगरगड येथे दोन नकाशे व ४१ बोर्ड लावले आहेत. रेल्वे स्थानकावरील तिकीट बुकींग काऊंटर, प्रसाधन गृह, प्रतीक्षालय, डॉरमेटरी, पाण्याचे बूथ यासह रेल्वे स्थानकाच्या प्रवेश द्वारांवर हे बोर्ड लावण्यात आले आहेत.
कुणाच्याही मदतीशिवाय जाणून घेणार ‘ट्रेन पोजीशन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 12:24 AM
‘भय्या गाडी कितने बजे आएगी...’ नेत्रहिनांकडून नेहमीच रेल्वे गांड्यांची स्थिती जाणून घेण्यासाठी नागरिकांकडे अशी मदत मागीतली जाते. याला मदत म्हणा किंवा विनवणी यामागचे शल्य त्या नेत्रहिनालाच कळते.
ठळक मुद्देनेत्रहिनांसाठी लागले ब्रेललिपी बोर्ड : रेल्वे विभागाचे नेत्रहिनांच्या मदतीसाठी पाऊल