लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोंदिया रेल्वे स्थानकावर आता सात फलाट आहेत. यानंतरही लोकल रेल्वेगाड्यांना तासनतास आऊटरवर उभे ठेवले जाते. यादरम्यान प्रवाशांना अकारण त्रास होतो. परंंतु अनेकदा तक्रारी करूनही रेल्वे प्रशासनाकडून लक्ष दिले जात नाही. त्यामुळे एखाद्या दिवशी प्रवाशांचा रोषाचा स्फोट रेल्वे अधिकाऱ्यांवर होवू शकतो.गोंदिया ते बालाघाट व बालाघाट ते गोंदिया ये-जा करणाºया रेल्वेगाड्यांच्या बाबत अशा घटना नेहमीच घडत असतात. बालाघाट ते गोंदिया डेमूचा वेळ गोंदियावरून ६.४५ वाजता सुटण्याचा आहे. तर गोंदियाला पोहोचण्याचा वेळ सकाळी ७.५५ वाजता आहे. ही गाडी वसंतनगरजवळ दरदिवशी ३० ते ५० मिनिटांपर्यंत उभी ठेवली जाते. त्यामुळे प्रवाशांना दुसरी गाडी पकडण्यासाठी मोठाच त्रास होतो.बालाघाटवरून लोक इतर रेल्वेगाड्या पकडण्यासाठी गोंदियाला येतात. परंतु आऊटरवर गाड्या थांबविण्यात येत असल्याने दुसºया गाड्या सुटतात व प्रवाशांना अकारण तासनतास गोंदिया रेल्वे स्थानकावर थांबून रहावे लागते. परंतु आतापर्यंत ही समस्या सोडविण्याच्या दिशेत कोणतेही पाऊल उचलण्यात आले नाही. ही बाब केवळ डेमू गाडीबाबतच नव्हे तर मेमू गाड्यांबाबतही हीच समस्या कायम आहे.इतवारी ते गोंदिया व दुर्ग ते गोंदिया येणाºया गाड्यासुद्धा अशाचप्रकारे आऊटरवर थांबविल्या जातात. इतवारीवरून येणाºया गाड्यांना तर गोंदियाजवळ दोन ठिकाणी थांबविले जाते.एक एमआयडीसीजवळ व त्यानंतर सूर्याटोलाजवळ. दोन्ही ठिकाणांवर एक तासापेक्षा अधिक वेळ प्रवाशांचा अकारणच जातो. दुर्गवरून येणाºया गाड्यांना सिव्हील लाईनजवळ प्रोग्रेसिव्ह शाळेजवळ उभे केले जाते.रेल्वे प्रशासनाकडे चौकशी केल्यावर सांगण्यात येते की, गोंदियात पर्याप्त प्लॅटफॉर्म नसल्यामुळे अशी स्थिती निर्मित होत आहे. जेव्हा या गाड्या पोहोचतात तेव्हा प्लॅटफॉर्म उपलब्ध राहत नाही. त्यामुळे सदर गाड्यांना आऊटरवर थांबविले जाते.
आऊटरवर तासनतास थांबतात रेल्वेगाड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2018 12:24 AM
गोंदिया रेल्वे स्थानकावर आता सात फलाट आहेत. यानंतरही लोकल रेल्वेगाड्यांना तासनतास आऊटरवर उभे ठेवले जाते. यादरम्यान प्रवाशांना अकारण त्रास होतो. परंंतु अनेकदा तक्रारी करूनही रेल्वे प्रशासनाकडून लक्ष दिले जात नाही.
ठळक मुद्देसमस्या निवारण? : प्रवाशांच्या समस्यांमध्ये सातत्याने वाढ