कपिल केकत ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : घरात निघणाऱ्या केरकचऱ्याची घरच्या घरीच विल्हेवाट लावता यावी, यासाठी आता नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाकडून शहरवासीयांना ‘होम कम्पोस्टींग’चे प्रशिक्षण दिले जात आहे. यांतर्गत नगर परिषदेच्या स्वच्छता विभागातील कर्मचारी शहरातील प्रत्येकच भागात जाऊन शहरवासीयांना याचे प्रात्यक्षिकातून प्रशिक्षण देणार आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्टार रँकींग व स्वच्छ सर्वेक्षण- २०१९ अंतर्गत नगर परिषदेने यासाठी सोमवारपासून (दि.३) ही मोहिम सुरू केली आहे. सध्यास्थितीत घरात निघणारा कचरा मोकळ््या जागेत टाकून शहरवासी मोकळे होत आहेत. यामुळे शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगार दिसून येतात. शहरात सर्वत्र विखुरलेल्या कचºयामुळे शहराचे सौंदर्य लोप पावत आहे. तर या कचऱ्यामुळे वातारवणही प्रदूषीत होत आहे. परिणामी शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. शिवाय शहरात मोठ्या प्रमाणात निघणाºया कचऱ्याची उचल व विल्हेवाट लावणेही नगर परिषदेसाठी जिकरीचे काम आहे. नेमकी हीच बाब हेरून स्वच्छ भारत अभियानांतर्गत नव्याने आलेल्या स्टार रँकींग व स्वच्छ सर्वेक्षण-२०१९ अंतर्गत ‘होम कम्पोस्टींग’ हा नवा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यांतर्गत, शहरवासीयांना त्यांच्या घरातील कचऱ्यावर घरातच प्रक्रिया करावयाची आहे. नगराध्यक्ष अशोक इंगळे, मुख्याधिकारी चंदन पाटील व प्रशासनीक अधिकारी सी.ए.राणे यांच्या मार्गदर्शनात नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाने या उपक्रमांतर्गत सोमवारपासून (दि.३) मोहीम सुरू केली आहे. त्यानुसार, स्वच्छता विभागातील कर्मचारी शहरातील प्रत्येकच भागात जाऊन १५-२० जणांच्या गटाला याबाबत प्रात्यक्षिकातून प्रशिक्षण देत आहेत. सोमवारी (दि.३) शहरातील प्रभाग क्रमांक १८ मधील गौतमनगर परिसरात नगरसेविका वर्षा खरोले व नगरसेवक विजय रगडे यांच्या उपस्थितीत स्वच्छता विभागातील अभियंता देवेंद्र वाघाये, आरोग्य निरीक्षक मुकेश शेंद्रे, मनिष बैरिसाल, प्रफुल पानतवने, सुमीत शेंद्रे यांनी हा ‘होम कम्पोस्टींग’चा प्रयोग नागरिकांना प्रात्यक्षिकातून करून दाखविला.अशी आहे ‘होम कम्पोस्टींग’ची प्रक्रियायांतर्गत दोन मडके घेवून त्यांना छिद्र करायचे असून त्यात घरातील भाजीपाला, झाडांची पाने अशा प्रकारचा ओला तसेच सुका कचरा टाकायचा आहे. या कचऱ्याला मिसळून झाकून ठेवायचे. दररोज हाच प्रकार केल्यास सुमारे १५-२० दिवसांत हे मडके भरल्यानंतर त्याला बंद करून ठेवायचे. त्यानंतर दुसऱ्या मडक्यात कचरा टाकून हाच विधी करायचा. अशात सुमारे १५-२० दिवसांत मडक्यांत खत तयार होत असून ते घरातील झाडांसाठी किंवा अन्यत्र वापरता येणार.या उपक्रमामुळे शहराचे वातावरण निरोगी राहणार असून आपले शहर स्वच्छ व सुंदर राहणार. यासाठी शहरवासीयांच्या सहकार्याची गरज आहे.-अशोक इंगळे,नगराध्यक्ष.........................शहरातील कचऱ्याची समस्या आता मार्गी लागणार असून शहर स्वच्छ करण्यास मदत होणार आहे. शहरवासीयांनी सहकार्य केल्यास शहर कचरामुक्त व सुंदर होईल.- चंदन पाटील,मुख्याधिकारी, नगर परिषद, गोंदिया.
शहरवासीयांना ‘होम क म्पोस्टींग’चे प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2018 12:55 AM
घरात निघणाऱ्या केरकचऱ्याची घरच्या घरीच विल्हेवाट लावता यावी, यासाठी आता नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाकडून शहरवासीयांना ‘होम कम्पोस्टींग’चे प्रशिक्षण दिले जात आहे. यांतर्गत नगर परिषदेच्या स्वच्छता विभागातील कर्मचारी शहरातील प्रत्येकच भागात जाऊन शहरवासीयांना याचे प्रात्यक्षिकातून प्रशिक्षण देणार आहे.
ठळक मुद्देस्वच्छ भारत अभियान : नगर परिषदेने छेडली मोहीम, शहर होणार स्वच्छ सुंदर