शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
3
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
4
Vinod Tawde News "मला भाजपवाल्यांनीच सांगितले की ते..."; विनोद तावडेंनी पैसे वाटल्याच्या आरोपांवर ठाकुरांचा मोठा दावा
5
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
6
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
7
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!
8
अमेरिकेत संक्रमित गाजर खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू, अनेक जण आजारी; १८ राज्यांमधून परत मागवले
9
Vinod Tawde विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, विरारमध्ये मोठा राडा; भाजपा म्हणते, ही तर स्टंटबाजी
10
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
11
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
12
स्पेस स्टेशनमध्ये सुनीता विल्यम्सची तब्येत बिघडली, वजन कमी होत आहे? स्वत: दिली माहिती
13
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या हंगामादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी, पटापट चेक करा आजचे नवे दर
14
मतदारांना लागणार चंदनाचा टिळा अन् मिळणार तुळशीचे रोप; पनवेल ठरणार लोकशाहीच्या उत्सवाचे मॉडेल
15
"महाविकास आघाडीचा खोटं बोलून सत्तेत यायचा प्रयत्न"; धनंजय मुंडेंचं टीकास्त्र
16
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
17
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
18
Naga chaitanya-Sobhita wedding: शोभिता नेसणार कांजीवरम साडी पण...; काय आहे खास?
19
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
20
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन

सेंद्रिय शेतीसंबंधी शेतकऱ्यांना प्रशिक्षण

By admin | Published: June 29, 2016 1:47 AM

तालुका कृषी अधिकारी कार्यालय अर्जुनी-मोरगावच्या वतीने परंपरागत कृषी विकास योजना (सेंद्रिय शेती) अंतर्गत निवड झालेल्या

बोंडगावदेवी : तालुका कृषी अधिकारी कार्यालय अर्जुनी-मोरगावच्या वतीने परंपरागत कृषी विकास योजना (सेंद्रिय शेती) अंतर्गत निवड झालेल्या ५० शेतकऱ्यांची कार्यशाळा महागाव-सिरोली येथे समाजमंदिरात घेण्यात आली. मार्गदर्शक म्हणून मंडळ कृषी अधिकारी एन.एच. मुनेश्वर, कृषी पर्यवेक्षक एम.बी. ठाकूर, व्ही.एच. कोहाडे, एन.एन. बोरकर उपस्थित होते. मार्गदर्शनात मुनेश्वर म्हणाले, सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून उत्पादीत शेतमालाला प्रचंड मागणी असल्याने शेतकऱ्यांना चांगला फायदा मिळतो. कृषी विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या शेततळे, प्रधानमंत्री पीक विमा योजना, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, अभियांत्रीकीकरण योजना, राष्ट्रीय फलोत्पादन योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनांचा लाभ घेण्यासाठी कृषी कार्यालयाशी कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले. कृषी पर्यवेक्षक ठाकूर म्हणाले, सेंद्रिय शेतीकरिता जनावरांचे फार महत्व आहे. गोमूत्र व शेणापासून कुजलेले शेणखत तयार करता येते. जिवामृत, बिजामृत, दशपर्णी अर्क यापासून जमिनीची सुपिकता वाढविता येते, असे त्यांनी सांगितले. व्ही.एच. कोहाडे यांनी सेंद्रीय शेतीबाबत, दिवसेंदिवस रासायनिक खताचा वापर केल्याने उत्पादन खर्च वाढतो. सेंद्रीय शेती केल्याने अवाजवी खर्चावर आळा बसून उत्पादीत मालास बाजारपेठ उपलब्ध होत असल्याचे सांगून शेतकऱ्यांना सदर प्रकल्पाची माहिती दिली. संचालन एन.एन. बोरकर यांनी केले. चचाणे यांनी आभार मानले. कार्यशाळेला शेतकरी गटातील ५० शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)