शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
2
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
3
विधानसभेसाठी सूक्ष्म नियोजन... लोकसभेनंतर वेगळी स्ट्रॅटेजी; भाजप महाराष्ट्रात 'कमबॅक' करणार?
4
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
5
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
6
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
7
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
8
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
10
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
11
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
12
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर
13
तेलंगणा सरकारच्या नोटीसवर दिलजीत दोसांझचं भर कॉन्सर्टमध्येच खरमरीत उत्तर, म्हणाला...
14
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
15
Ruturaj Gaikwad वर अन्याय? Devdutt Padikkal नं कशाच्या जोरावर मारली बाजी? जाणून घ्या सविस्तर
16
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
17
रस्ते फुलले, प्रचंड उत्साह आणि देवाभाऊंचा जयजयकार; नागपुरात देवेंद्र फडणवीसांचं शक्तिप्रदर्शन
18
Zomato Share Price : ५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
19
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
20
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 

३० मेपर्यंत घरकुलाचे हप्ते लाभार्थ्यांच्या खात्यात वळती करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 4:28 AM

गोंदिया : मार्चपर्यंत ‘ब’ यादीतील लाभार्थ्यांचे घरकुलाचे काम पूर्ण होणे गरजेचे होते. मात्र, अद्याप कामे पूर्ण झालेली नाहीत. कित्येक ...

गोंदिया : मार्चपर्यंत ‘ब’ यादीतील लाभार्थ्यांचे घरकुलाचे काम पूर्ण होणे गरजेचे होते. मात्र, अद्याप कामे पूर्ण झालेली नाहीत. कित्येक लाभार्थ्यांना हप्ते न मिळाल्याने त्यांना बांधकाम बंद करावे लागले आहे. अशात लाभार्थ्यांच्या खात्यात ३० मेपर्यंत हप्ते वळते करा अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा इशारा आ. विनोद अग्रवाल यांनी पंचायत समितीमधील अधिकारी व अभियंत्यांना दिला आहे.

येथील पंचायत समिती गटविकास अधिकारी तसेच पंचायत समिती घरकुल विभागाच्या सर्व कार्यकारी अभियंता व कनिष्ठ अभियंत्यांना घेऊन आ. विनोद अग्रवाल यांनी आढावा बैठक घेतली. विशेष म्हणजे, मार्च 2021 पर्यंत ‘ब’ यादीतील सर्व लाभार्थ्यांचे घरकुलाचे काम पूर्ण झाले पाहिजे होते; परंतु मे महिन्याच्या अखेरीसही अद्याप काम पूर्ण झाले नसल्याने आ. अग्रवाल यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच हजेरी घेतली. प्रशासकीय अधिकारी तसेच अभियंत्याच्या निष्काळजीपणामुळे कामे पूर्णत्वास जाऊ शकली नसल्याने नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागले. गावातील रोजगार सेवक कामाची मागणी करण्यासाठी टाळाटाळ करतात, असे आढळून आलेले आहे. अशा रोजगार सेवकांवर तात्काळ कार्यवाही करून लाभार्थ्यांचे मस्टर तात्काळ तयार करून कामाला सुरुवात करावी. काही रोजगार सेवकांनी कामाची मागणी केली असता त्यावर कोणतीही कारवाई केली जात नसल्याची तक्रार लाभार्थ्यांकडून केली जाते. यासंबंधी चर्चा करत आ. अग्रवाल यांनी रोजगार सेवकांकडून सादर केलेले मस्टर तात्काळ मंजूर करून लाभार्थ्यांना काम मंजूर करण्याचे निर्देश दिले.

लाभार्थ्यांना हप्ते न मिळाल्याने त्यांच्या घराचे कामे थांबून आहेत. शासनाने घरकुलासाठी पैसे दिले असूनही लाभार्थ्यांना पैसे का दिले जात नाहीत, असाही सवाल उपस्थित केला. मागील महिनाभर लाभार्थ्यांना शासनाच्या माध्यमातून रेती उपलब्ध करून दिली जाणार होती; परंतु रेतीचे घाट लिलाव न झाल्याने लाभार्थ्यांना रेती उपलब्ध होऊ शकली नाही. त्यामुळे स्वस्तातील रेती महागात खरेदी करून लाभार्थ्यांनी स्वखर्चातून घरकुलाचे बांधकाम पूर्ण केले. तरीही अद्याप लाभार्थ्यांना शासनाच्या माध्यमातून मिळणाऱ्या घरकुलाच्या पैशाचे हप्ते न मिळाल्याने बांधकाम बंद केलेला आहे. कित्येक लाभार्थी घरकुल योजनेचा लाभ मिळूनही कर्जबाजारी झाले असल्याचे आ. अग्रवाल यांच्या निदर्शनात आल्यावर त्यांचा अधिकाऱ्यांवर अधिकच पारा चढला.

यावर त्यांनी अधिकारी व अभियंत्यांना ३० मेपर्यंत सर्व लाभार्थ्यांना त्यांचे घरकुलाचे सर्व हप्ते अदा करण्याबाबत सूचना केल्या व असे न केल्यास संबंधित अधिकारी तसेच अभियंत्यांवर कारवाई करण्यास विलंब केला जाणार नाही अशी ताकीद दिली.

---------------

चार हजार लाभार्थी हप्त्यांपासून वंचित

गोंदिया तालुक्यात २३४७१ घरकुल लाभार्थ्यांना बांधकामाची परवानगी देण्यात आली होती, यापैकी १९४७७ लाभार्थ्यांना संपूर्ण पैसे अदा करण्यात आले. उर्वरित चार हजार लाभार्थ्यांना अद्याप त्यांची पूर्ण रक्कम मिळाली नसल्याने त्रासाला सामोरे जावे लागत आहे. आ. अग्रवाल यांनी झीरो पेंडन्सी दाखवत महिन्याच्या शेवटपर्यंत सर्व लाभार्थ्यांना संपूर्ण रक्कम अदा करण्याची अधिकारांना ताकीद दिली आहे.