शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
2
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
3
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
4
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
5
RIL share price: रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अनेक नेत्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात; कुणी कमावलं तर कुणी काय गमावलं? जाणून घ्या
7
मासेमारी करणाऱ्या बोटीत सापडले पाच टन ड्रग्ज, तटरक्षक दलाची सर्वात मोठी कारवाई
8
स्टेजवर जाऊन बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला केलं प्रपोज! दिलजीत दोसांझच्या पुणे कॉन्सर्टमधील व्हिडीओ व्हायरल
9
अहिल्यानगरमध्ये भाजपच्या दोघांना, राष्ट्रवादीच्या एकाला मिळू शकते संधी; मंत्रिपदाचे सात दावेदार!
10
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
11
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
12
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
13
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
14
Adani Group shares: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
16
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
17
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
18
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
19
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
20
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी

जिल्ह्यातील ११ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2019 9:51 PM

जिल्हा आस्थापनेवर कार्यरत असलेल्या पोलीस निरीक्षक व सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या प्रशासकीय बदल्या १ जुलै रोजी करण्यात आल्या. गोंदिया शहर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक मनोहर दाभाडे यांची बदली अर्जुनी-मोरगाव ठाणेदार म्हणून करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा आस्थापनेवर कार्यरत असलेल्या पोलीस निरीक्षक व सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या प्रशासकीय बदल्या १ जुलै रोजी करण्यात आल्या. गोंदिया शहर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक मनोहर दाभाडे यांची बदली अर्जुनी-मोरगाव ठाणेदार म्हणून करण्यात आली.आमगाव येथील ठाणेदार उमेश पाटील यांना गोंदिया शहर ठाणेदार म्हणून नियुक्ती देण्यात आली. गोंदियाच्या नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण यांना आमगावचे ठाणेदार, नियंत्रण कक्षातील सचिन वांगळे यांना रावणवाडी ठाणेदार, रावणवाडीचे ठाणेदार पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांना नियंत्रण कक्ष, नियंत्रण कक्षातील महादेव तोंदले यांना गोंदिया ग्रामीणचे ठाणेदार, गोंदिया ग्रामीणचे सुरेश नारनवरे यांना तक्रार अर्ज शाखा गोंदिया, नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक प्रमोद घोंगे यांना देवरीचे ठाणेदार, नियंत्रण कक्षातील महिला पोलीस निरीक्षक वैशाली पाटील गंगाझरी, चिचगड पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश भास्कर यांना नक्षल आॅपरेशन सेल देवरीचे प्रभारी अधिकारी तर देवरीच्या नक्षल आॅपरेशन सेलमधील सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल तवाडे यांना चिचगडचे ठाणेदार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. सदर नेमणूक पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी केली आहे.