लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : विधानसभा क्षेत्रातील ग्राम बनाथर ते ग्राम सतोना मार्ग गोंदिया- बालाघाट राष्ट्रीय राज्यमार्ग तसेच ग्राम चुटिया ते ग्राम पांगडी या दोन रस्त्यांच्या रूंदीकरण व डांबरीकरणासाठी ७.२० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे सुमारे ९ किमी लांबीच्या या दोन्ही रस्त्यांचा लवकरच कायापालट होणार आहे.क्षेत्रातील ग्राम बनाथर व ग्राम सतोना क्षेत्रात रेती घाट असल्यामुळे जड वाहनांचे मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढली आहे. यामुळे अपघाताची शक्यता व ग्रामीण भागातील नागरिकांच्या जीव व मालमत्तेच्या नुकसानीची शक्यता नाकारता येत नाही. जड वाहनांच्या आवागमनामुळे रस्त्यांचीही मोठ्या प्रमाणात दुर्दशा झाली आहे. तर ग्राम पांगडी क्षेत्रात पर्यटकांची संख्या वाढत आहे. अरूंद रस्त्यांमुळे असुविधा होते. या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी या दोन्ही रस्त्यांच्या रूंदीकरण व डांबरीकरणासाठी बांधकाम विभागाकडून प्रस्ताव तयार करवून शासनाकडे सादर केला होता.दरम्यान, यातील ग्राम बनाथरहून ग्राम सतोना मार्गे गोंदिया-बालाघाट राष्ट्रीय राज्यमार्गापर्यंत या सुमारे ७ किमी रस्त्यासाठी पाच कोटी ६० लाख रूपये. तसेच ग्राम चुटिया ते ग्राम पांगडी या २ किमी रस्त्यासाठी एक कोटी ६० लाख रूपये असा एकूण सात कोटी २० लाख रूपयांच्या निधी मंजूर करण्यात आला. यासाठी आमदार अग्रवाल यांनी, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे मागणी करून प्रस्तावाला मंजुरी मिळवून घेतली. त्यानुसार, नागपूर विभाग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांच्या आदेशावरून निधी मंजूर करण्यात आला आहे.
बनाथर-सतोना व चुटिया-पांगडी रस्त्याचा कायापालट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 9:53 PM
विधानसभा क्षेत्रातील ग्राम बनाथर ते ग्राम सतोना मार्ग गोंदिया- बालाघाट राष्ट्रीय राज्यमार्ग तसेच ग्राम चुटिया ते ग्राम पांगडी या दोन रस्त्यांच्या रूंदीकरण व डांबरीकरणासाठी ७.२० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे सुमारे ९ किमी लांबीच्या या दोन्ही रस्त्यांचा लवकरच कायापालट होणार आहे.
ठळक मुद्देरूंदीकरण व डांबरीकरण होणार : ७.२० कोटींचा निधी मंजूर