शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
3
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
4
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
5
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
6
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
8
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
9
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
10
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
11
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
12
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
13
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
14
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
15
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
16
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
17
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
19
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
20
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला

२१९ शाळांतील विद्यार्थ्यांची वाहतूक खासगी वाहनांनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2019 11:51 PM

विद्यार्थ्यांची वाहतूक सोयीस्कर व्हावी व त्यांना सुखरूप शाळेत व शाळेतून घरी सोडण्यात यावे यासाठी प्रत्येक शाळेत परिवहन समित्या स्थापन करण्याच्या सूचना आहेत. परंतु काही खासगी शाळा निव्वळ पैसा कमविण्याच्या नादात वाहतूक नियमांना धाब्यावर ठेवून भेटेल त्या वाहनातून विद्यार्थ्यांना शाळेत व शाळेतून घरी ने-आण करण्यासाठी वापर करीत आहेत.

ठळक मुद्दे१३६५ शाळांमध्ये परिवहन समित्या : १४९ शाळा देतात स्वत:ची वाहतूक व्यवस्था

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : विद्यार्थ्यांची वाहतूक सोयीस्कर व्हावी व त्यांना सुखरूप शाळेत व शाळेतून घरी सोडण्यात यावे यासाठी प्रत्येक शाळेत परिवहन समित्या स्थापन करण्याच्या सूचना आहेत. परंतु काही खासगी शाळा निव्वळ पैसा कमविण्याच्या नादात वाहतूक नियमांना धाब्यावर ठेवून भेटेल त्या वाहनातून विद्यार्थ्यांना शाळेत व शाळेतून घरी ने-आण करण्यासाठी वापर करीत आहेत.गोंदिया जिल्ह्यात १६५७ शाळा आहेत. त्यापैकी १३६५ शाळांमध्ये परिवहन समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. यापैकी फक्त १४९ शाळांमधील विद्यार्थ्यांना वाहतूक सेवा शाळेच्या स्वत:च्या बसमधून देण्यात येते. तर २१९ शाळांधील विद्यार्थ्यांची खासगी वाहनातून ने-आण केली जाते. ९३८ शाळांमधील विद्यार्थ्यांना वाहतूक सेवा देण्याची गरज नाही. तालुकास्तरीय परिवहन समित्यांच्या ८५५ बैठका घेण्यात आल्या. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील २०८ शाळांपैकी २१२ शाळांमध्ये परिवहन समिती गठित करण्यात आली. यापैकी सहा शाळांची स्वत:ची वाहतूक सेवा आहे. सहा शाळांत खासगी वाहनाने विद्यार्थ्यांची ने-आण केली जाते तर तीन शाळांत वाहतूक सेवेची गरज नाही.आमगाव तालुक्यातील १५४ शाळांपैकी १५४ शाळांमध्ये परिवहन समिती गठित करण्यात आली. यापैकी १२ शाळांची स्वत:ची वाहतूक सेवा आहे. ३२ शाळांत खासगी वाहनाने विद्यार्थ्यांची ने-आण केली जात असून ११० शाळांत वाहतूक सेवेची गरज नाही. देवरी तालुक्यातील २०८ शाळांपैकी २०८ शाळांमध्ये परिवहन समिती गठित करण्यात आली आहे. यापैकी सहा शाळांची स्वत:ची वाहतूक व्यवस्था असून ४२ शाळांत खासगी वाहनांनी विद्यार्थ्यांची ने-आण केली जाते. तर १६० शाळांत वाहतूक सेवेची गरज नाही. गोंदिया तालुक्यातील ४१३ शाळांपैकी २०८ शाळांमध्ये परिवहन समिती गठित करण्यात आली आहे. यापैकी ८७ शाळांची स्वत:ची वाहतूक व्यवस्था असून ५३ शाळांत खासगी वाहनाने विद्यार्थ्यांची ने-आण केली जाते. तर २८२ शाळांत वाहतूक सेवेची गरज नाही.गोरेगाव तालुक्यातील १५८ शाळांपैकी १५८ शाळांमध्ये परिवहन समिती गठित करण्यात आली आहे. यापैकी १४ शाळांची स्वत:ची वाहतूक व्यवस्था असून २२ शाळांत खासगी वाहनांनी विद्यार्थ्यांची ने-आण केली जाते. तर १२२ शाळांत वाहतूक सेवेची गरज नाही. सालेकसा तालुक्यातील १४३ शाळांपैकी १४३ शाळांमध्ये परिवहन समिती गठित करण्यात आली आहे. यापैकी नऊ शाळांची स्वत:ची वाहतूक व्यवस्था असून २६ शाळांत खासगी वाहनांनी विद्यार्थ्यांची ने-आण केली जाते. तर १०८ शाळांत वाहतूक सेवेची गरज नाही. सडक-अर्जुनी तालुक्यातील १७१ शाळांपैकी ८० शाळांमध्ये परिवहन समिती गठित करण्यात आली आहे. यापैकी आठ शाळांची स्वत:ची वाहतूक व्यवस्था असून १७ शाळांत खासगी वाहनांनी विद्यार्थ्यांची ने-आण केली जाते. तर सात शाळांत वाहतूक सेवेची गरज नाही. तसेच तिरोडा तालुक्यातील २०२ शाळांपैकी २०२ शाळांमध्ये परिवहन समिती गठित करण्यात आली आहे. यापैकी सात शाळांची स्वत:ची वाहतूक व्यवस्था असून २१ शाळांत खासगी वाहनाने विद्यार्थ्यांची ने-आण केली जाते. तर १४६ शाळांत वाहतूक सेवेची गरज नाही.अनफिट बसमधून विद्यार्थ्यांची वाहतूकचिमुकल्या विद्यार्थ्याना शाळेत ये-जा करण्यासाठी सुरक्षीत वाहनांची गरज असावी असे शासनाचे कडक निर्देश असतांना गोंदिया जिल्ह्यातील १६७ स्कूल बसेसने फिटनेस सर्टीफिकेट न घेताच महिनाभरापासून चिमुकल्या विद्यार्थ्यांची ने-आण सुरूच ठेवली आहे. परंतु त्यांच्यावर ना कारवाई ना दंड झाला. गोंदिया जिल्ह्यातील खासगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना घरून शाळेतपर्यंत व शाळेतून घरी सोडण्यासाठी स्कूल बसची व्यवस्था करण्यात आली. गोंदिया जिल्ह्याची परिस्थिती पाहता ३९१ स्कूल बस विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी आहेत. यापैकी फक्त २२४ स्कूल बसेसचे फिटनेस ( योग्यता प्रमाणपत्र) झाले आहेत. परंतु १६७ स्कूल बसेसचे फिटनेस झालेच नाही.

टॅग्स :Studentविद्यार्थी