शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

कचरापेट्यांकडे आहे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2021 4:33 AM

शिपाई भरतीची वयोमर्यादा वाढवा आमगाव : मागील २-३ वर्षांपासून पोलीस शिपाई भरतीप्रक्रिया झालेली नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील ...

शिपाई भरतीची वयोमर्यादा वाढवा

आमगाव : मागील २-३ वर्षांपासून पोलीस शिपाई भरतीप्रक्रिया झालेली नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील लाखो तरुण बेरोजगार आहेत. ते पोलीसभरतीच्या प्रतीक्षेत आहेत. महाराष्ट्राच्या बेरोजगार युवकांच्या दृष्टिकोनातून पोलीस भरतीसाठी वयोमर्यादा ३३ वर्षावरून ३५ वर्ष करण्यात यावी, अशी मागणी बेरोजगार तरुणांनी केली आहे.

बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट वाढला

सालेकसा : सध्या बदलत्या वातावरणामुळे सर्दी, खोकला, अंगदुखी व ताप यासारख्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. शिवाय गावांमध्ये डासांचा प्रादुर्भाव वाढला असून, त्यामुळे बोगस डॉक्टरांची चांदी आहे.

बाजारात वीज व्यवस्थेची मागणी

सइक अर्जुनी : येथील गावात आठवडी बाजार भरतो. गावात या रस्त्यावर रहदारी अधिकच असल्याने विद्युतपुरवठा सुरळीत करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या रस्त्यावर रात्रीच्या वेळी अंधाराचा सामना करावा लागतो. हा रस्ता सौंदड, पिपरी, कोहमारा या रस्त्याला मार्गक्रम आहे. या रस्त्यावर नेहमी लोकांची वर्दळ असते. तसेच येथील वॉर्ड क्रमांक-३ सर्व जनता याच मार्गावरती ये-जा करीत असतो.

मोकाट जनावरांमुळे वाहतुकीत अडथळा

तिरोडा : शहरातील रस्त्यांवर मोकाट जनावरांचा ठिय्या राहत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. मात्र याकडे नगर परिषदेचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना त्रास होत आहे.

ग्रामीण कारागिरांवर उपासमारीचे संकट

देवरी : जागतिकीकरणामुळे विविध आधुनिक साहित्य उपलब्ध होत आहे. ओघानेच आधुनिक केरसुणीमुळे पारंपरिक झाडू व्यवसाय हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. परिणामी पारंपरिक झाडू व्यवसाय करणारे अडचणीत आले आहेत.

तेंदूपत्त्याचे बोनस त्वरित द्या

इसापूर : अर्जुनी-मोर तालुक्यातील ग्राम ईटखेडा येथील फळीवर सन-२०१९ मध्ये तेंदूपत्ता नेणाऱ्या लोकांना बोनस अजूनपर्यंत न मिळाल्याने तो त्वरित देण्याची मागणी नागरिकांनी वनविभागाकडे केली आहे.

विश्रामगृह तयार करण्याची मागणी

केशोरी : जिल्ह्यास्थळावरून या भागाची पाहणी करण्यासाठी किंवा शासकीय कामासाठी येणारे वरिष्ठ अधिकारी आमदार, खासदार येथे येतात. त्यांना थांबण्यासाठी येथे विश्रामगृहाची आवश्यकता आहे.

निराधारांचे अनुदान त्वरित द्या

शेंडा कोयलारी : परिसरातील निराधार लाभार्थ्यांच्या बँक खात्यात मागील ३-४ महिन्यांपासून खात्यात अनुदान जमा झाले नाही. यामुळे त्यांची आर्थिक कोंडी होत आहे. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

सुरक्षा कवचाविना डीपी धोकादायक

तिरोडा : तालुक्यातील अनेक ठिकाणी वीज कंपनीच्या डीपी खुल्या अवस्थेत पडून आहेत. वीजपुरवठा या उघड्या डीपीमधून होत आहे. त्यामुळे त्यापासून केव्हाही मोठा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.