शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

जंगल सफारीकडे पर्यटकांचा कल वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 12:51 AM

जिल्ह्याला वरदान म्हणून लाभलेल्या नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात वाघोबाच्या दर्शनासाठी पर्यटकांची एकच गर्दी बघावयास मिळत आहे. यातून नागरिकांचा कल आता शहरातील सिमेंट-कॉँक्रीटचे जंगल सोडून जंगलातील विसावा व वन्यप्राणी दर्शनाकडे वाढत असल्याचे दिलासादायक चित्र आहे.

ठळक मुद्देव्याघ्र प्रकल्पात गर्दी : ७ महिन्यांत १९ हजार पर्यटकांची भेट

कपिल केकत।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्याला वरदान म्हणून लाभलेल्या नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात वाघोबाच्या दर्शनासाठी पर्यटकांची एकच गर्दी बघावयास मिळत आहे. यातून नागरिकांचा कल आता शहरातील सिमेंट-कॉँक्रीटचे जंगल सोडून जंगलातील विसावा व वन्यप्राणी दर्शनाकडे वाढत असल्याचे दिलासादायक चित्र आहे. एप्रिल ते आॅक्टोबर या ७ महिन्यांच्या कालावधीत व्याघ्र प्रकल्पात १९ हजार ८५ पर्यटकांनी जंगल सफारी केली आहे.गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र म्हणून १२ डिसेंबर २०१३ ला राज्यातील पाचवे व्याघ्र राखीव क्षेत्र अस्तीत्वात आले आहे. यात नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नवेगाव अभयारण्य, नागझिरा अभयारण्य, नवीन नागझिरा अभयारण्य व कोका अभयारण्य अशा एकूण चार अभयारण्य व एका राष्ट्रीय उद्यानाचा समावेश आहे. याचे क्षेत्रफळ ६५६.३६ चौरस किमी एवढे आहे. विशेष म्हणजे वाघोबाचे हमखास दर्शन होत असल्याने पर्यटकांची येथे नेहमीच गर्दी असते. त्यात आता व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळाल्याने याची राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीयस्तरावर ख्याती आहे. व्याघ्र प्रकल्प जिल्ह्याला लाभलेले एक वरदान आहे. त्यात आजघडीला धकाधकीच्या जीवनात थोडा विसावा मिळावा यासाठी सिमेंट-कॉँक्रीटचे जंगल सोडून नागरिकांचा कल निसर्गाच्या सानिध्याकडे दिसून येत आहे. म्हणूनच व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. सध्या सुट्यांचा आनंद लुटण्यासाठी नागरिक जंगल सफारीला पसंती देत आहे. यामुळेच व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारी करणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढतच चालली आहे.यंदा, एप्रिल महिन्यात पाच हजार १२१ पर्यटकांनी व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली आहे. मे महिन्यात यात वाढ झाली असून सहा हजार ८८० पर्यटकांनी जंगल सफारी केली आहे. जून महिन्यात पाच हजार ८६ पर्यटकांनी भेट दिली. पावसाळ््यामुळे मध्यल्या काळात व्याघ्र प्रकल्पात प्रवेश बंदी राहत असून आॅक्टोबर महिन्यात एक हजार ९९८ पर्यटकांनी जंगल सफारीचा आनंद लुटल्याची माहिती आहे. या आकडेवारीत मोठ्यांचा समावेश असतानाच दोन हजार ३६८ पर्यंटक १२ वर्षाखालील चिमुकले असून यातून चिमुकल्यांना वन व वन्यजीवांप्रती आवड निर्माण होत आहे.वन्यजीव विभागाला १४ लाखांचे उत्पन्नपर्यटकांना वन व वन्यजीव याबाबत आवड व आपुलकी निर्माण व्हावी या दृष्टीकोनातून वन विभागाकडून पर्यटकांना व्याघ्र प्रकल्पात प्रवेश दिला जात आहे. यासाठी शुल्क आकारले जाते. यातूनच वन विभागाला या पर्यटकांकडून १३ लाख ९४ हजार ६११ रूपयांचे आर्थिक उत्पन्न झाले आहे. यात, पर्यटकांच्या प्रवेशातून आठ लाख नऊ हजार ९११ रूपये, पर्यटकांना वापर केलेल्या वाहनांच्या प्रवेश शुल्कातून चार लाख ६३ हजार ७०० रूपये तर कॅमेरा शुल्कातून एक लाख २१ हजार रूपये असे एकूण १३ लाख ९४ हजार ६११ रूपये वन विभागाच्या तिजोरीत जमा झाले आहे.

टॅग्स :tourismपर्यटनforestजंगल